पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाला भेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:43+5:302021-03-23T04:12:43+5:30
पुणे नाशिक महामार्गावर काम अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे त्याचा फटका महामार्गावरुन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांना बसत आहे. ...
पुणे नाशिक महामार्गावर काम अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे त्याचा फटका महामार्गावरुन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांना बसत आहे. कांदळीफाटा या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाजवळ महामार्गाला मोठी भेग पडली होती गेल्या दोन वर्षांपासून ती भेग पडलेली आहे या ठिकाणी नारायणगावकडे जाणारी वाहने आदळतात याबाबत एक वर्षांपूर्वी येथील एका पत्रकाराने ही बाब राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक खोडसकर यांच्या निदर्शनास आणुन दिली होती, त्यानंतर दुस-याच दिवशी ही भेग बुजविण्यात आली होती व त्यानंतर ही भेग पुन्हा मोठी होऊन त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात येणारी जाणारी वाहने आदळत असतात. उड्डाणपुलावरुन उतरताना उतार असल्यामुळे वाहने वेगाने येतात व या खड्ड्यात आदळतात या खड्ड्यात दुचाकी वाहन आदळून अपघात होऊ शकतो त्यामुळे हा खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : २२ आळेफाटा पुणे-नाशिक महामार्ग
फोटो- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाला कांदळीफाटा येथे रस्त्याला मोठे खड्डे