फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास; बनायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार

By विवेक भुसे | Published: June 22, 2023 04:32 PM2023-06-22T16:32:33+5:302023-06-22T16:33:00+5:30

गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतरच त्याने लग्नाविषयी विचारले असावे, तिने नकार दिल्यावर खून केला

Part time study of food delivery Wanted to become an officer became a criminal | फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास; बनायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार

फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास; बनायचे होते अधिकारी झाला गुन्हेगार

googlenewsNext

पुणे : आयएएस, आयपीएस बनणाऱ्याचे स्वप्न घेऊन हजारो, लाखो तरुणतरुणी पुण्यात येत असतात. त्यातील काहीच जणांच्या प्रयत्नांना यश मिळते. अनेक जण अर्ध्यातून प्रयत्न सोडतात. काहींना नैराश्याने घेरले जाते तर, काहींना अपयश पचविता येत नाही. त्यातून अधिकारी बनायला आलेले गुन्हेगार बनल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राहुल हंडोरे हा त्यांच्यापैकीच एकच.

दर्शना पवार कोपरगावची तर राहुल नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील शहा गावाचा. दर्शनाच्या मामाचे घर राहुलच्या घरासमोरच असल्याने दोघांची लहानपणापासून ओळख होते. दोघेही पुण्यात गेल्या काही वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी आले होते. दर्शनाला यंदा यश मिळाले व ती वन अधिकारी होणार होती. दुसरीकडे राहुल हा फुड डिलिव्हरीचे अर्धवेळ काम करुन अभ्यास करत होता. दर्शनाविषयी त्याने आपल्या भावना या अगोदर तिच्यासमोर व्यक्त केल्या होत्या का, याची काही माहिती अद्याप समोर आली नाही. तिच्या घरचे तिच्या लग्नाचे पहात होते. त्यातून राहुल अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने तू माझी नाही होऊ शकत तर, कोणाचीच नाही, असा विचार करुन तिला संपविण्याचा इरादा करुन तिला राजगडावर ट्रेकिंगला घेऊन गेला असावा, असा संशय आहे. जाताना दोघेही व्यवस्थित बोलत होते, असे त्यांना जाताना पाहणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतरच त्याने तिला लग्नाविषयी विचारले असावे, तिने नकार दिल्यावर त्याने ठरविल्याप्रमाणे तिच्यावर वार करुन खून केला. सकाळी साडेआठ ते पावणे अकरा या सव्वा दोन तासात हा सर्व प्रकार घडला.

पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके राहुलचा शोध घेत होती. शेवटी तो अंधेरी रेल्वे स्थानकावर तो दुसऱ्या रेल्वेत बसून पळून जाण्याच्या विचारात असताना त्याला पकडण्यात आले.

Web Title: Part time study of food delivery Wanted to become an officer became a criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.