नवीन संघटनेत सहभागी क्लबवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:43+5:302021-09-07T04:13:43+5:30
पुणे : फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे या नवीन संघटनेमध्ये सहभागी असलेल्या क्लबविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे जिल्हा फुटबॉल ...
पुणे : फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे या नवीन संघटनेमध्ये सहभागी असलेल्या क्लबविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेने (पीडीएफए) दिला आहे. त्याचवेळी खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून नवीन नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे. सर्व खेळाडूंसाठी असलेली ही तीन महिन्यांची नोंदणी १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणार आहे.
पीडीएफएच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या वेळी पीडीएफएचे सचिव प्रदीप परदेशी, उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, समितीचे रत्नदीप रॉय, सिरील फ्रान्सिस, परेश शिवलकर, मिकी ॲग्नर उपस्थित होते.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेने १० वर्षांहून अधिक काळ पुणे जिल्ह्यातील फुटबॉल क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेच्या काही गटाकडून संघटनेच्या काही मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पीडीएफएने आपल्या धोरणांमध्ये पारदर्शकता ठेवली आहे व यापुढे पण ठेवणार आहे. आपल्या १० वर्षांमधील कामगिरीचा आणि समितीच्या निर्णयांची माहिती त्यांनी आज दिली.
पीडीएफएनी (पीडीएफए) नवीन नोंदणी झालेल्या संघटनेबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे या नावाखाली नुकत्याच नोंदणी केलेल्या संघटनेची गंभीर दखल पीडीएफएने घेतली आहे. पीडीएफएच्या गव्हर्निंग बॉडीने या घटनेमध्ये समाविष्ट फुटबॉल क्लबवर बंदी आणण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.