कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:13+5:302021-09-12T04:15:13+5:30
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ''कोरोनामुक्त गाव'' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात असून, गावपातळीवर ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी एकत्र येऊन त्याचे ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ''कोरोनामुक्त गाव'' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात असून, गावपातळीवर ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी एकत्र येऊन त्याचे जनचळवळीत रुपांतर होऊन काम केल्यास आपण कोरोनामुक्त होऊ शकतो. या हेतूने शासनाने वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबविली जात आहे. या योजनेसाठी महाविद्यालय परिसरातील किमान ४ स्वयंसेवक एका गावातील असणे अपेक्षित आहे. संबंधित स्वयंस्वेवक अंतिम वर्षास असणे गरजेचे आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम अधिकारी/प्राध्यापक व इच्छुक विद्यार्थी-स्वयंसेवकांची नावे ऑनलाईन पध्दतीने नोंदवता येणार आहे.
कोरोनामुक्त गाव मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना राज्य शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेबाबत व त्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कामाबाबत वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या महाविद्यालयांच्या प्रतिनिधीकडून सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे. तसेच झूम मिटिंगद्वारे याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले.