पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींचा महाश्रमदानात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:37+5:302021-09-17T04:15:37+5:30
पुणे जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून गुरुवारी हे अभियान राबविण्यात आले होते. जिल्हा परिषदेकडून जिल्हाभरातील पंचायत समित्या, त्यांचे पदाधिकारी, ...
पुणे जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून गुरुवारी हे अभियान राबविण्यात आले होते. जिल्हा परिषदेकडून जिल्हाभरातील पंचायत समित्या, त्यांचे पदाधिकारी, सर्व पक्षीय अध्यक्ष, पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सामाजिक संस्था या सर्वांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पुरंदर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ही या अभियान राबविण्यात आले होते. बेलसरचे सरपंच अर्जुन भेंडे, उपसरपंच धीरज जगताप, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, ग्रामपंचायत सदस्य, तसेच राष्ट्रीय कीटक संशोधन केंद्राच्या डॉ. महालक्ष्मी तसेच बेलसर विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षक, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बेलसर येथे झिका रुग्ण सापडल्यानंतर मोठ्या चर्चेत आलेल्या या गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी ग्रामस्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावठाण चकाचक केले. त्याचबरोबर गावठाणात तणनाशक फवारणी ही करण्यात आली.
—-
फोटो क्रमांक : १६ जेजुरी महाश्रमदान
बेलसर येथे ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी ग्रामस्थ
——————————