शहरातील भाजपात गटबाजी आली उफाळून

By admin | Published: June 22, 2017 07:22 AM2017-06-22T07:22:48+5:302017-06-22T07:22:48+5:30

पिंंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकार आणि कर्तव्ये, विषयांचे सादरीकरण, सभाशास्त्र, महापौरांचे वाहन

The party got divided in the BJP in the city | शहरातील भाजपात गटबाजी आली उफाळून

शहरातील भाजपात गटबाजी आली उफाळून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकार आणि कर्तव्ये, विषयांचे सादरीकरण, सभाशास्त्र, महापौरांचे वाहन, विविध समिती सदस्य निवड यावरून गटबाजी उफाळून येत आहे. त्यामुळे चिंचवडसमर्थक विरुद्ध भोसरीसमर्थक अशी गटबाजी दिसून येत आहे. मात्र, आमच्यात कोणतीही गटबाजी नसल्याचे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या गटांतील समर्थकांमध्ये मतभेद असल्याच्या घटना घडल्या आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विषय समिती अध्यक्ष, स्वीकृत सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निवडीच्या वेळी वाद उफाळून आला आहे.
समर्थकांमध्ये वादावादी
जून महिन्याची सर्वसाधारण सभा काल झाली. सायंकाळी सभा संपल्यानंतर पक्षनेत्यांच्या दालनात दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. नवीन सदस्यासमोरच ज्येष्ठांची वादावादी सुरू झाल्याने तेही अवाक् झाले. महापौरांना नवीन वाहन आणि सभाशास्त्र, सभागृह कसे चालवायचे, हक्क आणि कर्तव्ये यावरही सवाल-जबाब झाले. याची माध्यमांकडे वाच्यता होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांचे खासगी पीए, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढले. त्यानंतर सुमारे तासभर वादावादी सुरू होती. यावर तोडगा काढण्यासाठी परदेश दौऱ्यावर असणाऱ्या नेत्याचा फोनही महापौरांनी उचलला नाही. ज्येष्ठ सदस्य आणि सर्वांनी दोघांची समजूत काढल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.
दरम्यान, असे काही घडलेच नाही, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यातून भाजपात गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले. दरम्यान भाजपाचे भोसरीचे नेत्यांनी २२ नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावून सदस्यांना सूचना केल्या. त्यामुळे गटबाजी अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: The party got divided in the BJP in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.