Parvati vidhan sabha assembly election result 2024 : ‘पर्वती’मध्ये भाजपचा दबदबा..! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:01 AM2024-11-23T11:01:33+5:302024-11-23T11:27:59+5:30
Parvati vidhan sabha assembly election result 2024 :
Parvati vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांची आघाडी अधिक मजबूत झाली आहे. आठव्या फेरीअखेर त्यांनी १९,९१२ मतांची मोठी आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अश्विनी कदम, काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल आणि राष्ट्रवादीचे बंडखोर सचिन तावरे हे जरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी मतविभाजनामुळे विरोधक मोठ्या फरकाने पिछाडीवर गेले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024
आठव्या फेरीचे निकाल
- माधुरी मिसाळ (भाजप): ४६,६७६ मते (+१९,९१२ आघाडी)
- अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): २६,७६४ मते
- आबा बागुल (काँग्रेस बंडखोर): ५,५६२ मते
विरोधकांचे बंड आणि मतविभाजन
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बंडखोरीमुळे विरोधकांचे मतविभाजन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अश्विनी कदम आणि सचिन तावरे यांच्यातील मतांची विभागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मताधिक्यावर परिणाम करताना दिसत आहे.
पर्वतीतील भाजपचा दबदबा कायम
पर्वती मतदारसंघात भाजपचा प्रभाव कायम राहिल्याचे चित्र आहे. माधुरी मिसाळ यांना चौथ्या 'टर्म'साठी चांगला पाठिंबा मिळत आहे. पुढील फेऱ्यांमध्ये मिसाळ यांचे मताधिक्य वाढत राहते की विरोधक कमबॅक करण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४