Parvati vidhan sabha assembly election result 2024 :‘पर्वती’मध्ये भाजपच ! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ…

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:51 AM2024-11-23T11:51:48+5:302024-11-23T12:01:24+5:30

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल यांच्यातील मतविभाजनाचा फायदा मिसाळ यांना मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे

Parvati vidhan sabha assembly election result 2024 BJP in 'Parvati'! Madhuri Misal's lead increases | Parvati vidhan sabha assembly election result 2024 :‘पर्वती’मध्ये भाजपच ! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ…

Parvati vidhan sabha assembly election result 2024 :‘पर्वती’मध्ये भाजपच ! माधुरी मिसाळ यांच्या आघाडीत वाढ…

Parvati vidhan sabha assembly election result 2024 :  पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी ११व्या फेरीअखेर ३०,२५० मतांची मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल यांच्यातील मतविभाजनाचा स्पष्ट फायदा मिसाळ यांना होत असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Assembly Election Results

9व्या, ११व्या फेरीचे निकाल

नववी फेरी:

माधुरी मिसाळ (भाजप): ५४,०६० मते (+२५,१६९ आघाडी)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): २८,८९१ मते
आबा बागुल (काँग्रेस बंडखोर): ६,१४२ मते

११वी फेरी:

माधुरी मिसाळ (भाजप): ६०,३२९ मते (+३०,२५० आघाडी)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): ३२,०७९ मते
आबा बागुल (काँग्रेस बंडखोर): ६,६१८ मते

घोडदौड सुरूच...

पर्वती मतदारसंघात एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. ११व्या फेरीअखेर मिसाळ यांनी ३० हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. पुढील फेऱ्यांमध्ये विरोधक कमबॅक करतात का, याकडे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंतच्या निकालांनुसार, मिसाळ यांच्या बाजूने वातावरण दिसत असले, तरी अंतिम विजय घोषित होण्यासाठी अजून वेळ आहे.

विरोधकांचे मतविभाजन भाजपच्या पथ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अश्विनी कदम आणि बंडखोर सचिन तावरे यांच्यातील मतांची विभागणी राष्ट्रवादीच्या संभाव्य मताधिक्यावर थेट परिणाम करत आहे. काँग्रेसचे बंडखोर आबा बागुल यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या अधिकृत मतांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या मतविभाजनाचा भाजपला मोठा फायदा होत आहे.

माधुरी मिसाळ यांची घोडदौड

माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पर्वतीत भाजपची पकड आणखी मजबूत होत आहे. ११व्या फेरीतील मोठ्या आघाडीने त्यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत. मात्र, शेवटच्या फेऱ्यांपर्यंत निकालावर सस्पेन्स कायम राहणार आहे. मतदारसंघातील निकालावर राज्याचे लक्ष केंद्रित आहे.

इथे क्लिक करा >   महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४ 

Web Title: Parvati vidhan sabha assembly election result 2024 BJP in 'Parvati'! Madhuri Misal's lead increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.