Parvati vidhan sabha assembly election result 2024 : भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा ५० हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:45 PM2024-11-23T14:45:26+5:302024-11-23T14:53:35+5:30
Parvati vidhan sabha assembly election result 2024 :
Parvati vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या विसाव्या फेरीअखेर मिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यावर ५४,५१५ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विसाव्या फेरीचे अंतिम चित्र
- माधुरी मिसाळ (भाजप): १,१७,७८७ मते
- अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): ६३,३७२ मते
- मिसळ यांची विजयी आघाडी : ५४,५१५ मते
सलग चौथी टर्म
माधुरी मिसाळ यांनी सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघातून विजय मिळवला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात विरोधकांना यंदाही अपयश आले आहे. मिसाळ यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, जी प्रत्येक फेरीत वाढत गेली.
विरोधकांचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना प्रबळ विरोधक मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे कदम यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनीही निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मतविभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.
पर्वती भाजपसाठी अभेद्य गड
माधुरी मिसाळ यांच्या पर्वतीतील विजयाने भाजपचे या मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
यंदा पर्वतीत मंत्रिपद मिळणार
पर्वती मतदारसंघांमध्ये चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना १ लाख 17 हजार 887 हजार मतदान मिळाले. यामुळे पर्वतीत मंत्रिमंडळाची वर्दी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मिसाळ यांनी मंत्रिपद मिळाले असा विश्वास व्यक्त करीत पक्ष जे ठरवल ते मंत्रिपद घेऊन पर्वतीच्या जनतेच्या विकासासाठी यापुढे अधिक काम करणार असल्याचे सांगितले.
इथे क्लिक करा > महाराष्ट्र विधानसभा २०२४