प्रवासी महिलेचा बसमध्येच मृत्यू
By admin | Published: February 26, 2015 03:15 AM2015-02-26T03:15:25+5:302015-02-26T03:15:25+5:30
मुलीकडे निघालेल्या ज्येष्ठ महिलेचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घटना आज बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निग
पिंपरी : मुलीकडे निघालेल्या ज्येष्ठ महिलेचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घटना आज बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडी ते कासारवाडी प्रवासादरम्यान घडली. सावित्रीबाई ईश्वर भोंडवे (वय ७५, रा. पेठ क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई बुधवारी सकाळी कोथरूड येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी निगडी ते कात्रज या पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. सकाळी साडेअकरा वाजता बस खराळवाडी येथे आली असता, बसचे वाहक अमोल कदम यांनी वाहकाच्या सीटवर बसलेल्या सावित्रीबाई यांना हलवले. सावित्रीबाई यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. हालचाल नाही, डोळेही उघडले नाहीत. त्यामुळे चालकाने बस थेट चव्हाण रुग्णालयात नेली.
सावित्रीबाई यांचे कुटुंबीय रुग्णालयात आले असता, त्या आजारी असल्याचे त्यांनी संगितले. तसेच त्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)