धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:30 PM2023-05-30T12:30:56+5:302023-05-30T12:31:10+5:30

रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून एक अंदाजे वय ३५ वर्षे व्यक्ती खाली पडला

Passenger dies after falling from running train The dead body was found in the railway gate on Palkhi Marg | धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह

धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह

googlenewsNext

नीरा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व पुणे मिरज रेल्वे गेटमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. धावत्या रेल्वतून हा व्यक्ती रेल्वे गटच्या परिसरात पडला आहे. काल रात्री नऊच्या सुमारास हा मृतदेह पालखी मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना दिसून आला. 

पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरा ते वाल्हे दरम्यान असलेल्या पुणे मिरज रेल्वे मार्गावरील २७ नंबर रेल्वेगेट मध्ये सोमवारी (दि.२९) रात्री नऊच्या सुमारास एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावरील प्रवाशांना आढळून आला. रेल्वेगेट वरील कर्मचाऱ्यांनी नीरा रेल्वे पोलीस व स्थानिक ग्रामीण पोलीसांना याघटनेची कल्पना दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून एक अंदाजे वय ३५ वर्षे व्यक्ती खाली पडला. धावत्या रेल्वेमधून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. काही काळ रक्तस्राव झाल्याने तो जागीच मृत झाला. 

याघटनेची खबर नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी नीरा पोलीस दुरक्षेत्रात दिली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट, आत काळे बनियान, शर्टवर पिवळे जँकेट, काळी पँन्ट परिधान केली आहे. नीरा रेल्वे पोलीस व स्थानिक ग्रामीण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवला असल्याचे सांगितले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जेजुरी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Passenger dies after falling from running train The dead body was found in the railway gate on Palkhi Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.