आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:09 IST2024-12-25T20:06:25+5:302024-12-25T20:09:44+5:30
दुबर्इतून दोन आणि सिंगापूर, बैंकाकमधून एक अशी चार विमाने पुण्यात आले.

आंतरराष्ट्रीय उड्डाणाला प्रवाशांचा प्रतिसाद
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलवरुन उड्डाणाला मंगळवारपासून सुरु झाले. पहिल्या दिवशी पुण्यातून दुबर्इसाठी दोन आणि सिंगापूर एक असे तीन विमान उड्डाण झाले. यातून ४३१ प्रवाशांनी नव्या टर्मिनलवरील अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेतला. तर दुबर्इतून दोन आणि सिंगापूर, बैंकाकमधून एक अशी चार विमाने पुण्यात आले.
पहिल्याच दिवसी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे, विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे नव्या टर्मिनलवरुन सुरु झाल्याने जुन्या विमानतळावर प्रवाशांना येणाऱ्या अनेक अडचणीतून मुक्तता मिळाले आहे. भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्याचा फायदा होणार आहे.