प्रवाशांना लुटणारे रिक्षाचालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:11 AM2017-08-03T03:11:25+5:302017-08-03T03:11:27+5:30

शहरात बाहेरगावहून येणाºया जाणाºया प्रवाशांना भाडेतत्त्वावर बसवून घेत आडबाजूला नेऊन जबरदस्तीने लुटमार करणाºया दोन रिक्षाचालकांना युनिट ५ कडील पोलिसांनी जेरबंद केले.

Passenger rickshaw driver arrested | प्रवाशांना लुटणारे रिक्षाचालक अटकेत

प्रवाशांना लुटणारे रिक्षाचालक अटकेत

Next

पुणे : शहरात बाहेरगावहून येणाºया जाणाºया प्रवाशांना भाडेतत्त्वावर बसवून घेत आडबाजूला नेऊन जबरदस्तीने लुटमार करणाºया दोन रिक्षाचालकांना युनिट ५ कडील पोलिसांनी जेरबंद केले. प्रवाशांकडून लुटमार केलेली २५०० रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विकास शंकर धोत्रे (वय ३५, रा. ५७0 आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) आणि संदीप रामदास आरू (वय ४६, रा. खोपकर चाळ, वनराई कॉलनी वीर सावरकर चौक, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरतन नायक व त्यांचा आतेभाऊ काळू आपल्या मूळगावी राजस्थान येथे जाण्यासाठी कोल्हापूर ते स्वारगेट एसटी बसने येऊन स्वारगेट बसस्टँड येथे दुपारी १.३0 वाजता पोहोचले. तीन वाजता त्यांची पुणे-जयपूर अशी टेÑन असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी वाट पाहत थांबले होते. बाहेर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाने त्यांना रिक्षात बसवले. काही अंतर गेल्यावर प्रवाशांना खाली उतरून इथून पुणे स्टेशनला जाण्यास सांगितले. आम्हाला स्टेशनला जायचे आहे इथे रेल्वे दिसत नाही, असे म्हटल्यावर त्यांनी दोन्ही प्रवाशांना शिवीगाळ आणि मारहाण केली. गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ही घटना पाहिल्यानंतर काय प्रकार आहे असे विचारले असता प्रवाशांनी झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केल्याने दोघा रिक्षाचालकांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या वर्षभरात बाहेरून येणाºया व जाणाºया प्रवाशांना स्वारगेट, पुणे स्टेशन व शिवाजीनगर भागात लुटले असल्याची कबुली त्यांनी दिली. अशा प्रकारे लुटमार झालेल्या प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Passenger rickshaw driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.