‘एसटी’ चालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवाशांना वैताग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:07+5:302021-08-27T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसस्थानकात जर गेलात एक चित्र सर्वत्र सारखेच दिसते. ते म्हणजे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसस्थानकात जर गेलात एक चित्र सर्वत्र सारखेच दिसते. ते म्हणजे फलाट सोडून कोठेही लावण्यात आलेल्या बसगाड्या. यात सार्वाधिक संख्या लालपरीची असते. दिसली मोकळी जागा की लाव गाडी अशी स्थिती असते. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होतो. बसस्थानकात प्रवेश करण्यापासून ते गाडी शोधेपर्यंत प्रवाशांची चांगलीच दमछाक होते. शिवाय बसस्थानकाचे रूप देखील किळसवाणे वाटते.
बसस्थानकांच्या प्रवेशद्वारपासूनच बेशिस्तपणा दिसून येतो. स्वारगेट, वाकडेवाडी बसस्थानकामध्ये प्रवाशांना प्रवेश करणे मुश्किलीचे होते. बाहेर रिक्षाची दाटीवाटी असते यातून बसस्थानकात प्रवेश मिळविणे मुश्किलीचे होते. बसस्थानकात प्रवेश मिळाल्यानंतरही आतील चित्र देखील सारखेच असते. गाडीच्या मार्गानुसार त्यांना फलाट दिलेले असते. बाहेरच्या राज्यांतील अनेक गाड्यांना लवकर फलाट उपलब्ध होत नाही. मात्र, राज्याच्या गाड्यांना फलाट दिलेले असते. अनेकदा फलाट उपलब्ध नसल्याने अनेक एसटी चालक मिळेल त्या जागी गाड्या उभ्या करतात. फलाट उपलब्ध झाल्यानंतर ते पुन्हा फलाटावर गाड्या लावतात. मात्र, बसस्थानकावर तो पर्यंत बेशिस्तपणाचे दर्शन घडते.
बॉक्स १
या बेशिस्तपणाला कोण जवाबदार :
स्वारगेट बसस्थानकावर सध्या रोज किमान ७०० ते ८०० गाड्या येतात आणि जातात. त्यामुळे गाड्यांची खूप गर्दी असते. गाड्यांच्या वेळा देखील अनेकदा पाळले जात नाही. त्यामुळे गाड्यांना फलाट न मिळणे आदी कारणामुळे अनेक बसचालक बेशिस्तपणे गाड्या उभ्या करतात.
बॉक्स २
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
१. बसचालक अनेकदा कुठेही गाड्या लावतात. गाड्यांना गर्दी असते. त्यामुळे अनेक प्रवासी जिथे गाड्या लावतात त्याठिकाणी सीट मिळविण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा घाणीतून देखील जावे लागते. सोबत लहान मुले अथवा जास्तीचे सामान असेल तर त्याचा त्रास जास्त होतो.
प्रवीण माळी, प्रवासी
२. बसचालकांनी अन्यत्र गाड्या कुठेही न उभे करता आपल्या मार्गासाठी निर्धारित केलेल्या फलाटांवरच लावणे योग्य आहे. त्यामुळे प्रवाशांची शोधाशोध थांबेल. त्यामुळे त्यांना मनस्ताप देखील होणार नाही.
दीपाली फरड, प्रवासी