बस बाहेर तर प्रवासी अात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:24 PM2018-05-14T15:24:19+5:302018-05-14T15:24:19+5:30
संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर एकाच बाजूला दार असलेल्या काही बसेस पाठविण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असल्याने प्रवाशांनी नेमके कुठे थांबायचे असा प्रश्न निर्माण झाला अाहे.
पुणे : सार्वजनिक वाहतूक जलत व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी बीअारटी अर्थात जलद बस वाहतूक सेवा पुण्यातील काही मार्गांवर सुरु करण्यात अाली. परंतु ही याेजना सुरु करण्यात अाल्यापासूनच या याेजनेतील अनेक त्रृटी समाेर अाल्या. एकीकडे अनेक दिवसांपासून बीअारटी बसस्टाॅपचे दरवाजे नादुरुस्त असतानाचा अाता बीअारटी मार्गासाठी असणाऱ्या बसेस नादुरुस्त असल्याने जुन्या एका बाजूस दरवाजा असलेल्या बसेस संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीअारटी मार्गावर साेडण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असून बीअारटी बसस्टाॅपमध्ये थांबायचे की बाहेर अश्या व्दिधा मनस्थितीत प्रवासी असल्याचे पाहायला मिळत अाहे. त्यामुळे बस बाहेरुन तर प्रवासी बसस्टाॅपमध्ये असे चित्र सध्या येथे पाहायला मिळत अाहे.
उपनगरातील लाेकांना लवकरता लवकर शहरात येता यावे, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असा बीअारटी मार्ग सुरु करण्यामागील उद्देश हाेता. परंतु बीअारटी याेजना याेग्य पद्धतीने राबविण्यात येत नसल्याने या याेजनेचा बट्याबाेळ झाल्याचे चित्र अाहे. गेल्या काही दिवसांपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीअारटी मार्गावर काही जुन्या बसेस साेडण्यात येत अाहेत. या मार्गावर बीअारटीचे बसस्टाॅप हे रस्त्याच्या मधाेमध अाहेत. त्यामुळे उजवीकडील दरवाजा उघडणाऱ्या बसेस या मार्गावरुन धावणे अपेक्षित अाहे. त्याचबराेबर हे बसस्टाॅप काहीश्या उंचीवर असल्याने तसेच दाेन्ही बाजूंनी दुभाजक असल्याने या बसस्टाॅपच्या बाहेर थांबणे शक्य नाही. या मार्गासाठी केवळ उजव्या बाजूचे दरवाजे उघडणाऱ्या बसेस साेडणे अपेक्षित असताना, काही जुन्या बसेस या मार्गावर साेडण्यात येत असल्याने त्या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरील बाजूने जात अाहेत. त्यामुळे यातील बहुतांश बसेस या रिकाम्याच जात असून प्रवाशांमध्ये सुद्धा संभ्रमाचे वातावरण अाहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीअारटी मार्गासाठी साेडण्यात येणाऱ्या अनेक बसेस या खाजगी ठेकेदारांच्या अाहेत. त्यातील अनेक बसेसचे उजवे दरवाजे हे काही दिवसांपासून नादुरुस्त अाहेत. या बसेसच्या देखभालीकडे ठेकेदारांकडून लक्ष देण्यात येत नाही. तसेच पीएपीच्या मालकीच्या अनेक बसेसही नादुरुस्त अाहेत. परिणामी पीएमपीला या मार्गावर जुन्या बसेस साेडाव्या लागत अाहेत. या बसेस रिकाम्याच जात असल्याने पीएमपीला अार्थिक भुर्दंड सुद्धा साेसावा लागत अाहे. पीएमपीच्या या गलथान कारभरामुळे अनेक नागरिक बस एेवजी स्वतःच्या वाहनाने प्रवास करु लागले अाहेत. त्यामुळे या मार्गावर याेग्य बसेस साेडणार का, असा प्रश्न अाता प्रवासी विचारत अाहेत.
याबाबत बाेलताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय माने म्हणाले, बीअारटी मार्गावर दाेन्ही बाजूंना दरवाजे असलेल्या बसेस साेडण्यात येतात. या बसेस पैकी काही बसेस या नादुरुस्त अाहेत. पीएमपीच्या मालकीच्या 200 बसेसची देखभाल ही एक खाजगी कंपनीकडे हाेती. त्या कंपनीकडून पीएमपीच्या बसेस परत घेण्यात अाल्या अाहेत. त्यातील 50 बसेस या नादुरुस्त अाहेत. त्याचबराेबर खासगी ठेकेदारांच्या अनेक बसेसही नादुरुस्त अाहेत. त्यामुळे संगमवाडी-विश्रांतवाडी बीअारटी मार्गावर एकाच बाजूला दरवाजा असलेल्या काही बसेस साेडण्यात येत अाहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व इतर अडचणींमुळे नादुरुस्त बसेस दुरुस्त झाल्या नाहीत. नादुरुस्त बसेस लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येणार अाहेत.