गोळीबार करून प्रवाशाचा खून

By admin | Published: July 26, 2015 12:37 AM2015-07-26T00:37:29+5:302015-07-26T00:37:29+5:30

पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु.येथे हॉटेल नटराज येथे चहापानासाठी थांबलेल्या प्रवासी युवकावर तिघा जणांनी बेछूट गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला़

Passenger's blood by firing | गोळीबार करून प्रवाशाचा खून

गोळीबार करून प्रवाशाचा खून

Next

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु.येथे हॉटेल नटराज येथे चहापानासाठी थांबलेल्या प्रवासी युवकावर तिघा जणांनी बेछूट गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला़ चंद्रशेखर आचार्य (वय ३०, रा. बंगळुरू) असे या प्रवाशाचे नाव आहे़ ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली़
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु. येथील हॉटेल नटराजवर चहापानासाठी अनेक गाड्या थांबतात. त्यापैकी शिर्डीवरून बंगळुरूकडे जाणारी व्हीआरएल कंपनीच्या बसमधून चंद्रशेखर आचार्य व त्याचा मित्र अभिलाष हे इतर प्रवाशांसह चहापानासाठी गाडीतून खाली उतरले. किरकोळ खरेदी करीत असताना ३ ते ४ जणांनी चंद्रशेखर आचार्य यांच्या छातीवर दोन व पाठीवर एक गोळी अशा एकूण तीन गोळ्या झाडल्या़ त्यात चंद्रशेखर जमिनीवर खाली पडताना त्याचे तोंडावर, हातावर कोयत्याने तिघांनी वार केले. चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले़ हल्ला झाला त्या वेळी हॉटेल नटराज येथे तीन ते चार बस व त्यातील प्रवासी होते़ गोळीबार होताच एकच पळापळ झाली़ घबराटीत प्रवासी स्वत:ला वाचविण्यासाठी पळू लागल्याने हल्लेखोर कसे आले व कसे गेले, याची काहीही माहिती मिळू शकली नाही़


- चंद्रशेखर आचार्य व त्याचे मित्र गावाकडे साईबाबांचे मंदिर बांधणार आहेत. त्यासाठी ते मूर्ती घेण्यासाठी शिर्डीला आले होते़ मूर्ती खरेदी करून इतरांबरोबर त्यांनी ती गावाला पाठवून दिली़ खासगी बसने ते बंगळुरूला जात होते़ आचार्य हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले़ त्यातूनच हल्लेखोरांनी पाठलाग करून हा हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीनुसार पोलिसांचा संशय आहे़ त्यादृष्टीने तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याचे पथक बंगळुरूला गेले आहे़

Web Title: Passenger's blood by firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.