एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल ; खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:27 PM2018-06-09T14:27:47+5:302018-06-09T14:27:47+5:30
सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद कायम ठेवल्याने शिवाजीनगर एसटी स्थानकात प्रवाशांची माेठी गर्दी झाली हाेती. नायलाजाने प्रवाशांना खासगी बसने दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत हाेता.
पुणे : वेतनवाढ मान्य नसल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे अाताेनात हाल झाले. अनेकांना संपाबाबत माहिती नव्हते. त्यामुळे त्यांचा एसटी स्थानकात अाल्यानंतर हिरमाेड झाला. तर अनेकांना संप मिटला असेल अशी अाशा असल्याने बससेवा सुरु झाली का हे पाहण्यासाठी एसटी स्थानक गाठले हाेते. परगावावरुन पुणे मार्गे दुसरीकडे जाणारे प्रवासी या संपामुळे अडकून पडल्याचे चित्र हाेते. प्रशासनाकडून काही ठिकाणच्या गाड्या साेडण्यात येत असल्या तरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी अाहे.
वेतनवाढ मान्य नसल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी कुठलिही पूर्वसूचना न देता संपावर गेले. त्यामुळे विविध एसटी स्थानकांवर प्रवाशांची माेठी गर्दी दिसून अाली. मुलांच्या शाळा सुरु हाेत असल्याने गावी परतनारे तसेच गावावरुन शहरात येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. कोणत्याही संघटनेने संपाला पाठिंबा दिला नसला, तरी शिवसेनाप्रणीत कामगार संघटना या संपात सहभागी झाली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी राज्यातील २५० बस आगारांतून दुपारी चारपर्यंत ३० टक्के बस फेऱ्या झाल्या. एकूण ३५ हजार २४९ फेऱ्यांपैकी १० हजार ३९७ फेऱ्या सुरळीत झाल्या. या संपाची तीव्रता मुख्यत्वे पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर जाणवली. त्यातुलनेत मराठवाडा आणि विदर्भातील ६० टक्के वाहतूक सुरळीत होती. शिवाजीनगर एसटी स्थानकातून बीड ला निघालेले एक वयस्कर अाजाेबा म्हणाले, मुलगा पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करताे. त्याच्याकडे काही दिवसांसाठी अालाे हाेताे. काल येथे अालाे तर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे कळाले, त्यामुळे पुन्हा घरी परतावे लागले. अाज बससेवा सुरळीत झाली असेल असे वाटले म्हणून अाज पुन्हा अालाे हाेताे. अाता पुन्हा घरी परतावे लागणार अाहे. या संपामुळे प्रवाशांचे माेठे हाल हाेत अाहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला हवे. एसटीचं 150 रुपये भाडं अाहे परंतु खासगी बसवाले 450 रुपये भाडं घेत अाहेत. त्यामुळे अडलेल्या प्रवाशांची माेठी लूट चालू अाहे. ज्यांना बाहेरगावी जाणे अावश्यक अाहे त्यांच्यासमाेर कुठलाही पर्याय उरलेला नाही.
कर्नाटकवरुन अाैरंगाबादला सत्यानंद नायक निघाले हाेते. पुण्यात अाल्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे कळाले. त्यामुळे अाैरंगाबादला जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला हाेता. अाैरंगाबादला जाणाऱ्या काही शिवशाही बसेस साेडण्यात येत असल्या तरी त्याचे तिकिट घेण्यासाठी माेठी रांग लागली हाेती. त्यामुळे त्यांना तिकिट मिळेल अशी अाशा वाटत नव्हती. तिकिट न मिळाल्यास खासगी बसने जाण्याचा पर्याय त्यांच्यासमाेर हाेता. हिंगाेलीला निघालेले लक्ष्मण सुतार म्हणाले, हिंगाेलीला निघालाे हाेताे, येथे अाल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे समजले. हिंगाेलीला जायचे कसे असा प्रश्न अाता निर्माण झाला अाहे. खासगी बसवाले एसटीपेक्षा दुप्पट भाडे घेतात. परंतु खासगी बसने जाण्याशिवाय अाता पर्याय उरला नाही.
शिवाजीनगर एसटी स्थानकातील परिस्थितीबाबत बाेलताना अागार प्रमुख ज्ञानेश्वर रनावरे म्हणाले, ज्याप्रमाणे गाड्या उपलब्ध हाेत अाहेत, त्या पद्धतीने अाम्ही साेडत अाहाेत. सध्या अाैरंगाबाद, नाशिक, मराठवाडा इकडे जाणाऱ्या 80 बसेस साेडण्यात अाल्या अाहेत. जास्तीत जास्त बसेस साेडण्याचा अामचा प्रयत्न असणार अाहे. त्यातही शिवशाहीचे प्रमाण अधिक असून प्रवाशांना एसटी स्थानकातच तिकिट काढून प्रवास करावा लागत अाहे. काही बसेसमध्ये कंडक्टर अाहेत.
दरराेज शिवाजीनगर अागारातून 850 बसेस साेडण्यात येतात. शनिवारी दुपारी एक पर्यंत केवळ 80 बसेस साेडण्यात अाल्या हाेत्या.