कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:51 PM2018-05-03T18:51:51+5:302018-05-03T18:51:51+5:30

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पाच प्रवाशांना गुंगीचे औैषध देऊन १ लाख १४ हजार रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे.

passengers robbed by plagiarism In the Karnataka Express | कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले

Next
ठळक मुद्देदौैंड रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवून घेतले

दौैंड : कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पाच प्रवाशांना गुंगीचे औैषध देऊन १ लाख १४ हजार रुपयांची लूट केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांनी दिली. अमित गिरी (वय २४, रा. आसेगा, उत्तर प्रदेश), मुकेश शेकाया (वय २६, रा. नेपाळ) अमरसिंग धामी (वय ४0, रा. नेपाळ), घनश्याम रामजी निशाद (वय २२, रा. उत्तर प्रदेश), गणेशकुमार निशाद (रा. उत्तर प्रदेश) या प्रवाशांना तीन अज्ञात प्रवाशांनी शीतपेयामधून गुंगीचे औैषध दिले. त्यांना बेशुद्ध अवस्थेतच दौैंड रेल्वे स्थानकात उतरविण्यात आले. बंगलोर-दिल्ली-कर्नाटक एक्स्प्रेस बंगलोरचे रेल्वेस्थानक सोडल्यानंतर, काही अंतरावर तीन अज्ञात व्यक्तीवरील प्रवाशांजवळ आले. त्यांच्याशी मैैत्री वाढविली. दरम्यान, त्यांना आग्रह करून शीतपेयामधून गुंगीचे औैषध दिले. चोरट्यांनी घड्याळ, मोबाईल, रोख रक्कम, बॅगा असा ऐवज लंपास केला. बराच वेळ प्रवासी झोपूनच असल्याने डब्यातील इतर प्रवाशांना शंका आली. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना जाग आली नाही. गाडी दौैंड रेल्वेस्थानकात आल्यानंतर प्रवाशांनी ही घटना रेल्वे प्लॅटफार्मवरील रेल्वे सुरक्षा जवानांना कळविली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवून घेतले. त्यांच्यावर दौैंडच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या मदतीने त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात मैत्री वाढवू नका रेल्वे प्रवास करत असताना कोणी ओळख करून देत असेल तर ती करू नये. ओळख झाल्यास मैत्री वाढवू नका. अनोळखी प्रवाशांकडून कुठलेही खाद्य, पेय घेऊ नये कारण चोरटे जिवाभावासारखे वागतात आणि गुंगीचे औैषध देऊन नंतर चोऱ्या करतात. तेव्हा प्रवाशांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन रेल्वेचे पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांनी केले आहे.

Web Title: passengers robbed by plagiarism In the Karnataka Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.