प्रवाशांना टुरच्या पैशांसह १२ लाख ४१ हजार रुपये परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:27+5:302021-03-10T04:13:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केरळ आणि कन्याकुमारी टुरचे संपूर्ण पैसे भरूनही कंपनीकडून प्रवाशांना योग्य सेवा देण्यात आली नाही. ...

Passengers will have to repay Rs 12 lakh 41 thousand including tour money | प्रवाशांना टुरच्या पैशांसह १२ लाख ४१ हजार रुपये परत करावे लागणार

प्रवाशांना टुरच्या पैशांसह १२ लाख ४१ हजार रुपये परत करावे लागणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केरळ आणि कन्याकुमारी टुरचे संपूर्ण पैसे भरूनही कंपनीकडून प्रवाशांना योग्य सेवा देण्यात आली नाही. याप्रकरणी कंपनीने कसूर केल्याबददल प्रवाशांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपाईपोटी एका हॉलिडेज कंपनीला पाच लाख मोजावे लागणार लागणार आहे. कंपनीला एकूण १२ लाख ४१ हजार रुपये तक्रारदारांना परत करावे लागणार आहेत.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्वागत हॉलिडेज विरोधात हा निकाल दिला आहे. तक्रारदारांनी कंपनीकडून केरळ आणि कन्याकुमारी टुरसाठी कंपनीचे पॅकेज घेतले होते. ही टूर कंपनीने एक दिवस उशिराने सुरू केली. विमानाने पुण्याहून कोयंबटूर एवजी बंगरुळला नेले. ट्रीप मॅनेजर बरोबर पाठवला नाही. साध्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. हॉटेलमध्ये पाणी, जेवण आणि इतर अनेक बाबींकरता आम्हाला खर्च करावा लागला. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना अतिरिक्त १ लाख ५३ हजार रुपये खर्च करावा लागला, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार तक्रारदारांना टूरसाठी भरलेले ५ लाख १६ हजार ५०० रुपये टूर कंपनीने १० टक्के व्याजाने परत करावे. दंडात्मक खर्च म्हणून दोन लाख रुपये द्यावेत. तसेच प्रवाशांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी पाच लाख रुपये आणि तक्रारखर्च म्हणून २५ हजार रुपये तक्रारदारांना द्यावेत, असा निकाल आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी दिला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर ४५ दिवसांत पैसे परत न केल्यास १५ टक्के व्याज आकारले जाईल, असे आदेशात नमूद आहे. प्रवाशांच्या वतीने अँड. ज्ञानराज संत यांनी या तक्रारीचे कामकाज पाहिले. टुरच्या पुढील खर्चासाठी कंपनीने ४० हजार रुपये तक्रारदारांकडून घेतले. हे पैसे परत करण्यासाठी दिलेला दोन लाख रुपयांचा चेक कंपनीने दिला होता. मात्र तो वटलाच नाही.

----------------------------

Web Title: Passengers will have to repay Rs 12 lakh 41 thousand including tour money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.