पिंपरी-चिंचवडला होणार वाहन पासिंग, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर चाचणी घेणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:51 AM2017-11-01T05:51:36+5:302017-11-01T05:52:48+5:30
वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.
पुणे : वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबरपासून सरकारी जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर चाचणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या पुढे खासगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यांवर चाचणी घेता येणार नाही. परिवहन विभागाच्या राज्यातील ४० कार्यालयातील शासकीय जागांवर बांधकाम विभागाच्या माध्यमातून ट्रॅक उभारण्यात येत आहेत. आज अखेरीस १४ ट्रॅक उपलब्ध आहेत. उर्वरीत ट्रॅक तयार होई पर्यंत याच ट्रॅकवर चाचणी घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडला ट्रॅक तयार असल्याने, जिल्ह्यातील वाहनचालकांनी येथे वाहन परवाना नूतनीकरणासाठी वाहन आणावे, असे आवाहन केले आहे.
कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, सोलापूर, बुलडाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर ग्रामीण, अकोला, यवतमाळ येथील परिवहन विभागाच्या कार्यालयांकडे ट्रॅक उपलब्ध असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.