ऑक्सिजनअभावी पटेल रुग्णालयाने रुग्ण घेणे थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:07+5:302021-04-24T04:12:07+5:30

जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होत नाही, तोपर्यंत पेशेंट ठेवणं हे धोक्याचे ठरणार असल्याचा दावा कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पुण्यात ...

Patel Hospital stopped taking patients due to lack of oxygen | ऑक्सिजनअभावी पटेल रुग्णालयाने रुग्ण घेणे थांबवले

ऑक्सिजनअभावी पटेल रुग्णालयाने रुग्ण घेणे थांबवले

Next

जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची सोय होत नाही, तोपर्यंत पेशेंट ठेवणं हे धोक्याचे ठरणार असल्याचा दावा कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

पुण्यात गेले काही दिवस ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. त्याचाच फटका आता कॅन्टोन्मेंटचा सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाला बसायला लागला आहे.

प्रयत्न करून ही पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे आता या रुग्णालयाला नवीन पेशनंट घेणं थांबवण्याची वेळ आली आहे. एकीकडे अनेक खासगी रुग्णालयांनी पेशंट घेणं थांबवलेल असताना आता सरकारी रुग्णालयात देखील ही परिस्थिती ओढवली आहे.

पटेल रुग्णालयात पुणे महापालिका आणि कॅन्टोन्मेंटचे रुग्ण उपचार घेत आहेत.

आयसीयू व्हेंटिलेटरसहित सुसज्ज असलेले हे रुग्णालय मोठा आधार ठरला होता. मात्र, आता ऑक्सिजन तुटवड्याचा मोठा फटका या रुग्णालयाला बसलेला दिसतो आहे.

कोट

‘लोकमत’शी बोलताना कॅन्टोन्मेंटचे सीईओ अमित कुमार म्हणाले “ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत नाहीये. तीन दिवसांपूर्वी नगरला पाठवलेला ऑक्सिजन टँकर आता भरून येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये धोका पत्करणे शक्य नाहीये. त्यामुळे सध्या जेवढे रुग्ण आहेत त्यांच्यावरच उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आम्ही सोय करत आहोत. मात्र, तोपर्यंत नवीन पेशनंट घेणं थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.”

Web Title: Patel Hospital stopped taking patients due to lack of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.