रुग्ण हक्क परिषदेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:21+5:302021-01-13T04:22:21+5:30

पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठये म्हणाल्या कि, महिलांच्या अत्याचार बद्दल कोणतीही तक्रार येथे दाखल करून घेतली जात नाहीये. सर्व ...

Patient Rights Council protests in front of Vishrantwadi Police Station | रुग्ण हक्क परिषदेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

रुग्ण हक्क परिषदेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

Next

पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठये म्हणाल्या कि, महिलांच्या अत्याचार बद्दल कोणतीही तक्रार येथे दाखल करून घेतली जात नाहीये. सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.

राज्य उपाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणल्या कि, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात सामान्य नागरिकांना पोलिसांची प्रचंड भीती वाटते. अशी भीती गुंड किवा अवैध धंदे चालकांना वाटत नाही. मटका, हातभट्टी, जुगार, पणती-पाकोळी, डॉटबॉल, भंगार कसीनो, लॉज, वेश्या व्यवसाय, अवैध बार रेस्टॉरंट, चोरीचे भंगार गोळा करणे. जुलूम जबरदस्ती करून सावकारी धंदा चालविनाऱ्या धंदेवाईक गुंडांकडून ‘मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली’ करून विश्रांतवाडी पोलिस ठाण्याची हद्द म्हणजे अवैधधंदे चालकांचे ‘माहेरघर’ झाली आहे.

पुणे जिल्हा प्रभारी गिरीष घाग म्हणाले कि, अवैधधंद्या विरोधात आवाज उठवणाऱ्या विरुद्ध नेहमीच खोट्या केस केल्या जातात. मारहाण सुध्दा करतात. शासकीय कामात अडथळे आणले म्हणून गुन्हा दाखल केला जातो.

फोटो : रुग्ण हक्क परिषदेची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विश्रांतवाडी शाखा अध्यक्ष मीना शिंदे, शहराध्यक्ष विकास साठये, उपाध्यक्ष नितीन चाफळकर, गीता साका, अर्चना प्रधानसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Patient Rights Council protests in front of Vishrantwadi Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.