संपामुळे रुग्णांचे हाल; उपचारासाठी रांगा
By admin | Published: March 22, 2017 03:21 AM2017-03-22T03:21:51+5:302017-03-22T03:21:51+5:30
ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल झाले. तपासणी, औषधे, सिटी स्कॅन, क्ष-किरण केंद्रासमोर लागलेल्या
पुणे : ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल झाले. तपासणी, औषधे, सिटी स्कॅन, क्ष-किरण केंद्रासमोर लागलेल्या रुग्णांच्या रांगा, रांगांमध्ये उभे असलेले बाहेरगावहून उपचारांसाठी आलेले रुग्ण व काहींच्या चेहऱ्यावर हवालदिल भावना, असे चित्र संपाच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात पाहायला मिळाले; मात्र अतिरिक्त डॉक्टरांची सोय करण्यात आल्याने रुग्णांची गैैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ससून रुग्णालयाची ‘लोकमत प्रतिनिधी’ने पाहणी केली असता रुग्णांनी नाराजी व्यक्त केली.
ससून रुग्णालयात कोणतीही घटना घडलेली नसताना रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मत ससूनमधील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले. वैैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना मेडिकल एज्युकेशन टेक्निकल सेल; तसेच बायो एथिक्स याविषयांतर्गत, संवादकौैशल्य, ताणव्यवस्थापन, समुपदेशन, रुग्णांशी सुसंवाद, अशा अनेक बाबींचे ज्ञान दिले जाते. या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष काम करताना वापरणे गरजेचे आहे. डॉक्टरांप्रमाणेच, रुग्णाच्या नातेवाइकांचे समुपदेशन होण्याचीही गरज आहे. वैद्यकशास्त्रातील नवनवीन संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान यांमुळे समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत; रुग्णाच्या मृत्यूचा दोष डॉक्टरांना देता येत नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी डॉक्टर, रुग्णांमध्ये सुसंवादाची गरज आहे, असेही सूत्रांनी सांगितले.