होम आयसोलेशनमधील रुग्ण, नातेवाईकांकडून सर्वाधिक संसर्गाचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:11+5:302021-04-03T04:09:11+5:30

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोजची रुग्णसंख्या ८००० च्या पुढे गेली आहे. त्यातील ७६ टक्के रुग्ण ...

Patients in home isolation, the highest spread of infection from relatives | होम आयसोलेशनमधील रुग्ण, नातेवाईकांकडून सर्वाधिक संसर्गाचा प्रसार

होम आयसोलेशनमधील रुग्ण, नातेवाईकांकडून सर्वाधिक संसर्गाचा प्रसार

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोजची रुग्णसंख्या ८००० च्या पुढे गेली आहे. त्यातील ७६ टक्के रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र, पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून क्वारंटाइनचे नियम पाळले जात नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांनी विशेष काळजी घेण्यावर भर देणे गरजेचे मानले जात आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या ६४,८३७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३२,८७५ रुग्ण जिल्ह्यातील हॉटस्पॉट परिसरांमध्ये आहेत. त्यापैकी ७६ टक्के लोक गृह विलगीकरणात तर २४ टक्के लोक रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरांवर स्टिकर लावले जात असले किंवा प्रशासनाकडून कडक नियम केले जात आहेत. तरी रुग्णांकडून ते पाळले जात नाहीत. त्यांचे समुपदेशन, जनजागृती आणि नियमांना जुमानत नसल्यास कारवाई करावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

होम आयसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण जास्त असणे, ही दिलासादायक बाब असली, तरी अनेक ठिकाणी रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच हा पर्याय निवडत आहेत. आपल्याला लक्षणे नाहीत, कसलाही त्रास नाही, त्यामुळे घरात राहणेच बरे असे निर्णय परस्पर घेतले जात आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे होम आयसोलेशनची नियमावली काढणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

----

होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या सूचना

* होम आयसोलेशनच्या काळात ट्रिपल लेयर मेडिकल मास्क वापरणे बंधनकारक

* रुग्णाला स्वतंत्र खोलीतच राहावे लागेल. खोलीला स्वच्छतागृह असणे आवश्यक.

* घरातील अन्य सदस्य विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा रुग्णाशी संपर्क होता कामा नये.

* रुग्णाने पुरेसा आराम करायला हवा आणि जास्तीत जास्त द्रवपदार्थ प्यायला हवेत.

* श्वाच्छोश्वासाच्या स्थितीबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.

* पाणी आणि साबण किंवा अल्कोहोलसहित सॅनिटायझरने कमीत कमी ४० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुवावेत.

* रुग्णाच्या व्यक्तिगत वस्तू इतरांनी घेऊ नयेत.

* रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला मानावा लागेल.

काही लक्षणे दिसताच तातडीने यंत्रणेला, डॉक्टरांना कळवावे लागेल.

--------

रुग्णांना घरबसल्या उपचार मिळावेत आणि सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार करावे लागू नयेत, यासाठी सात ते १७ दिवसांपर्यंतचे ‘होम केअर’ देण्यास बऱ्याच हॉस्पिटलनी सुरुवात केली आहे. यामध्ये औषधोपचारांसोबतच डॉक्टरांशी संपर्क साधण्याची सुविधा, होम केअर किट, ‘पीपीई’चे डिस्पोजल किट अशा सुविधा दिल्या आहेत; काही हॉस्पिटल्सतर्फे थेट डॉक्टरांशी व्हिडीओ कन्सल्टिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. रुग्णाच्या शारीरिक तपासणीमध्ये ईसीजी, छातीचा एक्स-रे; तसेच अन्य तीन चाचण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

----

जिल्ह्याच्या हॉटस्पॉटमधील स्थिती :

पुणे पिं. चिं. ग्रामीण

होम आयसोलेशन 28532 13728 2789

हॉस्पिटल 4343 2816 6795

एकूण सक्रिय 32875 16544 9584

Web Title: Patients in home isolation, the highest spread of infection from relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.