रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपताहेत रुग्ण; बेड मिळेना, अनेकजण घरीच घेताहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:13+5:302021-04-17T04:11:13+5:30

- नॉन कोविड रूग्णांची टेस्ट केल्याशिवाय भरती होईना; रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही ताण पुणे : कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून ...

Patients lying on the ground in hospitals; Beds are not available, many are taking treatment at home | रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपताहेत रुग्ण; बेड मिळेना, अनेकजण घरीच घेताहेत उपचार

रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपताहेत रुग्ण; बेड मिळेना, अनेकजण घरीच घेताहेत उपचार

Next

- नॉन कोविड रूग्णांची टेस्ट केल्याशिवाय भरती होईना; रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही ताण

पुणे : कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत असून, त्यामुळे शहरातील खासगी आणि सरकारी दोन्ही रूग्णालये रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे नवीन नॉन कोविड रूग्णांसाठी जागाच उपलब्ध नाही, अनेक ठिकाणी तर खाली जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर रूग्णांना झोपवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बरेच रूग्ण घरीच सलाइन लावून उपचार घेत आहेत. दरम्यान, रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांवरही याचा ताण येत असून, ते देखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाची कोरोनाची वाढती रूग्णसंख्या मोठी आहे. मार्च महिन्यांपर्यंत कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात होती. पण एप्रिल सुरू झाला आणि संख्या वाढू लागली. सध्या तर नाॅन कोविड रूग्णांसाठी खासगी रूणांलयांमध्ये जागाच नसल्याने या रूणांचे हाल होत आहेत. परिणामी घरीच उपचार घेण्याची पाळी या रूग्णांवर येत आहे. रूग्णांलयातील व्हरांड्यात देखील रूग्ण बसल्याने रूग्णालय प्रशासनावर, तेथील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे.

———————————-

एका ८१ वर्षीय महिलेला अचानक ताप, अंगदुखी होऊ लागली होती आणि त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. तरी देखील ताप कमी होत नव्हता. मग त्यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. तर एका ठिकाणी कोरोना टेस्ट करावी लागेल, असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीचा निगेटिव्ह रिपोर्ट त्यांना दाखवला, पण त्यांनी तो ग्राह्य धरला नाही. पुन्हा टेस्ट करायची म्हटले तर दोन दिवस त्यात घालवणे शक्य नसल्याने रूग्णाला दुसऱ्या मोठ्या रूग्णालयात नेण्यात आले. तिथेही परिस्थिती भयानक होती. ते पाहून रूग्णच घाबरला. रिसेप्शनच्या आजूबाजूला आणि जमिनीवर सर्वत्र रूग्ण होते. ते पाहून ज्येष्ठ आजारी महिला म्हणाली, ‘‘हे पाहून मी इथंच प्राण सोडेन असं वाटतंय.’’ रूग्णाच्या नातेवाईकाची तिथल्या डाॅक्टरांशी ओळख होती. म्हणून त्यांच्याशी संपर्क साधून लगेच रूग्णाची तपासणी करायला घेतली. तेव्हा रूग्णाला चिकनगुनिया झाल्याचे निदान झाले. मग तिथे बेड उपलब्ध नव्हता. व्हरांड्यात चादर टाकून रुग्णाला ठेवावे लागेल, असे सांगण्यात आले. परिणामी रूग्णाला घरीच घेऊन जाणे योग्य होते आणि घरीच उपचार करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. रूग्णाला घरी आणून सलाइन लावण्यात आले. अशीच स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. रूग्णालयांतील रूग्णांची स्थिती पाहून घरीच उपचार घेणे योग्य असल्याचे मत बनत आहे.

—————————

सिलिंडर घेऊन बेडच्या प्रतीक्षेत

कमला नेहरू पार्क रूग्णालयातही समोरच ऑक्सिजन सिलिंडर लावलेले रुग्ण पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रुग्णालयात एखादा रूग्ण गेला तर हे दृश्य पाहूनच त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे. परिणामी मनातून त्यांचे खच्चीकरण होते. ही स्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी योग्य दक्षता घेऊन ससंर्ग पसरू नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे.

—————————

Web Title: Patients lying on the ground in hospitals; Beds are not available, many are taking treatment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.