इंदापूरमध्ये पुन्हा भरणे- पाटील आमने सामने; कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 08:14 PM2021-02-23T20:14:06+5:302021-02-23T20:15:25+5:30

कर्मयोगी कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक स्व. शंकरराव पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे.

Patil and Bharne front of each other in Indapur; Election of Karmayogi Sugar Factory announced | इंदापूरमध्ये पुन्हा भरणे- पाटील आमने सामने; कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

इंदापूरमध्ये पुन्हा भरणे- पाटील आमने सामने; कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

Next

कळस: इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे .दाखल करण्याची मुदत सोमवार दि.१ मार्चपर्यंत असुन मतदान दि. २७ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा भरणे - पाटील आमनेसामने येणार आहेत.

मंगळवार दि २३ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. १ मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. २ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे , १७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

इंदापुर कालठण पळसदेव भिगवण शेळगाव या पाच गटामधून प्रत्येकी ३ संचालक व भटक्या जमाती प्रवर्ग १,मागास प्रवर्ग १,अनुसुचित जमाती १,महिला २, ब वर्ग १,असे २१ संचालक मंडळासाठी निवडणुक होत आहे.

कर्मयोगी हा उपपदार्थ निर्मिती असलेला साखर कारखाना आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक स्व. शंकरराव पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सतांतरासाठी नेहमी प्रयत्न झाला.  मात्र माजी मंत्री पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली. २०१५ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले. त्यामुळे पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले. आत्ता मात्र होणाऱ्या या निवडणुकीसाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे  राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची भुमीका महत्वाची राहणार आहे.

Web Title: Patil and Bharne front of each other in Indapur; Election of Karmayogi Sugar Factory announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.