लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामाची पाटील यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:10+5:302021-09-13T04:10:10+5:30
बावडा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दि. १ ऑगस्ट रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या ...
बावडा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दि. १ ऑगस्ट रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या स्मारकाच्या ठिकाणी चबुतरा, संरक्षक भिंत, स्वागत कमान आदी कामे वेगात सुरू आहे. काम प्रगतिपथावर आहे. या कामाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी समाधान व्यक्त केले. बावडा गावच्या वैभवात भर पडेल, असे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे हे स्मारक उभारले जात आहे. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव आवारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
बावडा येथे आण्णाभाऊ साठे स्मारकाची पाहणी करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे.