Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:55 IST2024-12-19T18:55:39+5:302024-12-19T18:55:52+5:30

शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी घेतलेली आघाडी कायम ठेवत तेलुगु संघावर मात केली

Patna team beats Telugu team 41-37 in Pro Kabaddi League | Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात

Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात

पुणे : पाटणा पायरेट्स संघाने तेलुगु टायटन्स संघावर ४१-३७ अशी मात केली आणि प्रो कबड्डी स्पर्धेत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. मध्यंतराला पाटणा संघाने १९-१८ अशी आघाडी घेतली होती. 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन स्पर्धेत पाटणा संघाने यंदाच्या मोसमात झालेल्या वीसपैकी आठ सामने जिंकले होते तर तेलुगु टायटन्स संघाने आतापर्यंत २० सामन्यांमध्ये अकरा विजय मिळवले होते. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करीत असल्यामुळेच आजचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आघाडी घेण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले मात्र पाटणा संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे तेलुगु संघाने त्यांच्यावर पहिला लोण चढविला.

हा लोण स्वीकारल्यानंतरही पाटणा संघाची जिद्द कायम होती. त्यामुळेच त्यांनी पिछाडी भरून काढीत मध्यंतराला एक गुणाची नाममात्र आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात सुरुवातीलाच त्यांनी लोण चढविला आणि सामन्यातील रंगत वाढवली. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे तीन गुणांची आघाडी होती. त्यांचा भरवशाचा खेळाडू देवांक याने खोलवर चढाया करीत आपल्या संघास अधिकाधिक गुण मिळवून दिले. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कमी करण्यासाठी तेलुगु संघाने केलेले प्रयत्न अपुरे ठरले.

Web Title: Patna team beats Telugu team 41-37 in Pro Kabaddi League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.