पाटसला बाळगोपाळांची ग्रंथदिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:19+5:302021-07-21T04:10:19+5:30
पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजावी याकरिता बाळगोपाळांच्या प्रतीकात्मक ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मंदिरातून पालखीचे ...
पाटस येथील ज्ञानदीप ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजावी याकरिता बाळगोपाळांच्या प्रतीकात्मक ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. दरम्यान, ग्रंथदिंडी गावातील गणपती मंदिर, राम मंदिर, ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर तसेच गावातील मुख्य पेठेतून विठुरायाच्या नाम गजरात टाळ, मृदुंग, वीणा घेऊन वाजतगाजत निघाली होती. प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या कुतूहलाने या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले.
पालखीमध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, भगवतगीता असे ग्रंथ ठेवण्यात आले होते.
फुगड्या, फेर धरून आनंदमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आरती झाल्यानंतर ज्ञानदीप ग्रंथालय व पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने बाळगोपाळांना वह्यांचे व खाऊचे वाटप करून ग्रंथदिंडीची सांगता करण्यात आली.
-------
फोटो क्रमांक : २० पाटस दिंडी
फोटोओळ,--- पाटस ( ता. दौंड ) येथे बाळगोपाळांनी काढलेली ग्रंथ आणि वृक्ष दिंडी