पाटसला रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:10 AM2021-04-12T04:10:22+5:302021-04-12T04:10:22+5:30
हा सामाजिक उपक्रम मंगेश दोशी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आला होता. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
हा सामाजिक उपक्रम मंगेश दोशी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अवंतिका शितोळे, नितीन दोरगे आदी उपस्थित होते. रमेश थोरात म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा आहे. तेव्हा रक्तदात्यांनी रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासावी तसेच येणाऱ्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित करणे काळाची गरज राहील असेही ते म्हणाले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यसाठी शिवाजी ढमाले, मिलींद दोशी, जाकीर तांबोळी, संतोष शितकल, पोपट गायकवाड, नितीन शितोळे, लहु खाडे, समाधान शिंदे, विनोद भोसले, राहुल आव्हाड यांच्यासह पूना ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले.
११ पाटस
रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रमेशथोरात, अवंतिका शितोळे व इतर.
पाटस ता. दौंड येथे रक्तदान शिबीराचे ऊदघाटन करतांना रमेश थोरात आणि मान्यवर )