पाटसकरांनी रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:50+5:302021-07-19T04:08:50+5:30
पाटस: दैनिक लोकमत, पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला पाटसकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
पाटस: दैनिक लोकमत, पाटस ग्रामविकास फाऊंडेशन आणि पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला पाटसकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरात ११३ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले. या शिबीराला दौंड येथील रोटरी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य मिळाले.
शिबीराचे उदघाटन पाटसच्या सरपंच अवंतिका शितोळे, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीराच्या सुरुवातीला युवा रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी उबेद बागवान, सलमान तांबोळी, तौफिक तांबोळी, आसिफ तांबोळीं,आशिष कासवा
सोहेल तांबोळी,फुजेल तांबोळी
सुयोग कुलकर्णी, चैतन्य बंदीष्टी शाहिद बागवान, अपूर्व गदादे जईद बागवान, जाकीर बागवान, या युवा तरुणांनी रक्तदान केले. दरम्यान, किरण व काजल जाधव, जुनेद व आफ्रीन तांबोळी, वशीम व रुक्सार तांबोळी, हर्षद व सोनाली बंदिष्टी, शैलेश व संगीता इंगुलकर, विनोद व राजश्री सोनवणे या सहा दांपंत्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
पाटस ग्रामविकास फाऊंडेशनचे आणि पाटस व्यापारी संस्थाचे विनोद कुरुमकर, जुनेद तांबोळी हर्षद बंदीष्टी, गणेश जाधव स्वप्नील सोनवणे,राजू गोसावी, नानासाहेब म्हस्के,प्रवीण आव्हाड प्रमोद कुरुंद,रुपेश रोकडेशैलेश बारवकर, गणेश शितोळे यांची शिबीरासाठी मोलाची कामगीरी झाली. या व्यतिरिक्त महिला कार्यकर्त्या अपर्णा कुरुमकर, सोनाली बंदीष्टी, निकिता जाधव सुचिता जठार तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल ढमाले, प्रशांत खरात, बापू सोनवणे, ऑक्सिरेड मिनरल वॉटर यांचे शिबीराला सहकार्य मिळाले.
या शिबीरास उपसरपंच छगन म्हस्के, पोलीस उपनिरिक्षक संजय ननागरगोजे, वासुदेव काळे , योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे, डॉ. मधुकर आव्हाड, सुभाष रंधवे , तानाजी दिवेकर , मिलींद दोशी , संभाजी देशमुख, संभाजी खडके, शिवाजी ढमाले, दादा भंडलकर , तृप्ती भंडलकर, माऊली शेळके , महादेव चौधरी , सयाजी मोरे , ॲड. उदय फडतरे, निळकंठ बंदिष्टी, अशोकराव बंदिष्टी, राजू शिंदे, मनोज फडतरे, सुभाष डाबी , गणेश आखाडे , राजू झेंडे , सचिन आव्हाड , डॉ. लाड आदींनी सदिच्छा भेटी दिल्या.
चौकट..........
दौंडच्या बोरावके नगर येथील रहिवासी व सिप्ला कंपनीतील कामगार किरण जाधव आणि त्यांची पत्नी यांना दौंड येथील लोकमतच्या शिबीरात रक्तदान करायचे होते. मात्र या दिवशी सायंकाळी जोराचा पाऊस सुरु झाल्याने या दांपंत्याला रक्तदान स्थळी पोहाचता आले नाही त्यामुळे त्यांचे रक्तदान हुंकले परिणामी पाटस येथील रक्तदान शिबीराची माहिती कळताच जाधव दांपंत्य त्यांच्या तान्हुल्या बाळाला घेऊन रक्तदानाला आले यावेळी या दांपंत्यानी रक्तदान केले.
१८ दौंड रक्तदान
रक्तदान शिबीराचे उदघाटन करताना सरपंच अवंतिका शितोळे , पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील आणि इतर.
१८ दौंड रक्तदान १
रक्तदान शिबीर यशस्वी करणारे पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आणि पाटस व्यापारी संस्थेचे शिलेदार.