पवनेला पूर ...

By admin | Published: July 31, 2014 03:02 AM2014-07-31T03:02:06+5:302014-07-31T03:02:06+5:30

गेल्या २४ तासांपासून मावळ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी नदीला पूर आला आहे

Pawanela flood ... | पवनेला पूर ...

पवनेला पूर ...

Next

पिंपरी : गेल्या २४ तासांपासून मावळ तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना, इंद्रायणी नदीला पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रावेत, केजूदेवी बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. मावळातील नद्यांना पूर आला असून, गावांचा संपर्क तुटला आहे. घोरावाडी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म खचला आहे. शहरातील रस्त्यारस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. कामगारवर्ग, शाळकरी मुले यांची तारांबळ उडाली. सखल भागांत असणाऱ्या झोपडीपट्टी भागातील घरांमध्ये पाणी शिरले. पिंपरीत ग्रेडसेपरेटरमध्ये पाणी साचल्याने दिवसभर वाहतूक बंद होती. त्यामुळे पिंपरी व वाकडमध्ये वाहतूककोंडी झाली.

महामार्गावर कोंडी,
घरांत शिरले पाणी

पावसामुळे पिंपरीतील ग्रेडसपरेटरमध्ये पाणी साचले असल्याने वाहतूक बंद केली होती. बंगळूर महामार्गावरही वाकडला वाहतूक कोंडी झाली होती. वाकडमधील सुदर्शननगर कॉलनी क्रमांक ६ मध्ये पावसाआधी ड्रेनेज साफ न केल्याने ते तुंबून गुडघाभर पाणी साचल्याने रहिवाशांची धावपळ झाली. पहाटेपासून रात्र जागून काढली. दोन घरांत मैलामिश्रित पाणी शिरले. प्ािंपळे सौदागर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे, तर पवनानगर येथील विद्युत डीपी पवनानदी पात्रात पडल्याने अनेक तास या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.

Web Title: Pawanela flood ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.