‘नीरा-भीमा’च्या अध्यक्षपदी पवार
By admin | Published: April 13, 2015 11:04 PM2015-04-13T23:04:41+5:302015-04-13T23:04:41+5:30
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी लालासाहेब पवार तर उपाध्यक्षपदी कांतिलाल झगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी लालासाहेब पवार तर उपाध्यक्षपदी कांतिलाल झगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकानंतर झालेल्या बैठकित दोघांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी केली. निवडीनंतर कारखान्याचे संस्थापक,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नुतन पदाधिकाऱ्यांना सहकाराची उत्तम जाण आहे. त्यांच्या कार्यकाळात निरा-भिमा कारखान्याची प्रगतीचा आलेख उंचावत राहिल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष पवार, उपाध्यक्ष झगडे यांना आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी केले. आभार तानाजी देवकर यांनी मानले. यावेळी संचालिका भाग्यश्री पाटील, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, प्रशांत पाटील, विकास पाटील, कृ ष्णाजी यादव,अनिल पाटील, किरण पाटील, माऊली बनकर,मंगेश पाटील, अशोक इजगुडे, भरत शहा, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, प्रताप पाटील, शंकर घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतिश अनपट, अजिनाथ बोराटे, नामदेव किरकत आदी उपस्थित होते.
भाग्यश्री पाटील यांचा नकार
४अध्यक्षपदाच्या निवडीआधी सर्व संचालकांनी भाग्यश्री पाटील यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली. मात्र, भाग्यश्री पाटील यांनी इतर कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिक ा स्वीकारत यास नकार दर्शविला.