पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:16+5:302021-08-01T04:10:16+5:30
इंदापूर : सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं ही पदविकाधारक प्रमाणपत्र प्राप्त असूनही आजही यांना १९८५ च्या कायद्यानुसार पशुंची सेवा करताना ...
इंदापूर : सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं ही पदविकाधारक प्रमाणपत्र प्राप्त असूनही आजही यांना १९८५ च्या कायद्यानुसार पशुंची सेवा करताना व उपचार करताना काही जाचक निर्बंध घालून दिले आहेत. सरकारने पशुधन पर्यवेक्षक यांच्या मागण्यांकडे लक्ष घालावे. अशी मागणी डॉ. शशिकांत तरंगे यांनी केली आहे.
इंदापूर तालुका पशुधन पर्यवेक्षक महासंघाच्या वतीने इंदापूर तालुक्यात जंक्शन विचार विनिमय बैठक झाली. यावेळी तालुक्यातील २०० डॉक्टर बैठकीमध्ये सहभागी झाले. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी सर्व पशुधन पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. तरंगे बोलत होते. पशु सेवा करताना, खूप अडचणी यांना येत आहेत. त्यामध्ये तातडीनं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून पशुधन पर्यवेक्षक यांच्या मागणीकडे न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा पशुधन पर्यवेक्षक महासंघाच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येतील असा इशारा महासंघाचे संस्थापक डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला.
जंक्शन येथे पशुधन पर्यवेक्षक बैठकीला उपस्थित डॉक्टर व अधिकारी