कामे न करताच ठेकेदाराला बिले अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:22 AM2021-09-02T04:22:03+5:302021-09-02T04:22:03+5:30
इंदापूर रिपाईचे जिल्हाधिकाºयांना निवेदन बारामती : पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्ता साफसफाईचे काम न करता बोगस बिले घेणाऱ्या ठेकेदाराला शासनाने काळ्या ...
इंदापूर रिपाईचे
जिल्हाधिकाºयांना निवेदन
बारामती : पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्ता साफसफाईचे काम न करता बोगस बिले घेणाऱ्या ठेकेदाराला शासनाने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रिपाईंच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
रिपाईंचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नितीन आरडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील भिगवण ते हिंगणगाव दरम्यानचा रस्ता साफसफाई, झाडलोट, साईटपट्या देखभाल-दुरुस्ती, डिव्हायडरमधील झाडांना पाणी घालणे व सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी कामाचा ठेका केडगाव-चौफुला येथील ठेकेदार कंपनीकडे आहे. सदर कंपनीला काम न करताच संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडून प्रत्येक महिन्याला बिले अदा करण्यात येत आहेत. यामध्ये महामार्ग प्रशासन अधिकारी व संबंधित काम घेणार कंपनी ठेकेदार यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार (दि. १५) पासून शासकीय वेळेत इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.
-------------------------