जाहिरात फलकासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाखांची लाच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:50+5:302021-05-13T04:10:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जाहिरात फलक लावण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी ...

Pay a bribe of Rs 3.5 lakh for a no-objection certificate for a billboard | जाहिरात फलकासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाखांची लाच द्या

जाहिरात फलकासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाखांची लाच द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जाहिरात फलक लावण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ लाख ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

बसवराज धोंडोपा चित्ते असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चित्ते हे येरवडा वाहतूक विभागात उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीला आहे. तक्रारदार यांना जाहिरात फलक लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ३ लाख ६० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची १६ एप्रिल, २० एप्रिल व ३ मे रोजी पडताळणी केली. त्यात चित्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही, तरीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असल्याने शेवटी लाच लुचप्रतिबंधक विभागाकडून लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pay a bribe of Rs 3.5 lakh for a no-objection certificate for a billboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.