तीन लाखांपर्यंत पीक कर्ज भरा; शून्य टक्के व्याजदर मिळवा : आनंद थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:15+5:302021-03-14T04:12:15+5:30
आनंद थोरात म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा कार्यालय मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत ...
आनंद थोरात म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा कार्यालय मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत आहेत. या दिवशी वीज बिले, कर्ज वसुली, ठेव संकलन आदी बाबींचा जमा, खर्च सुरू ठेवण्यात आला आहे. परंतु या दिवशी आरटीजीएस, एएफटी, पेमेंट, क्लिअरिंगचे व्यवहार बंद राहतील असा निर्णय बँकेच्या संचालक मंडळ यांच्या वतीने बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी घेतला आहे.
वीज बिले भरायची आहेत अशांनीही,तसेच शून्य टक्के व्याजदर मिळवण्यासाठी कर्जाचा भरणा मुदतीत करून फायदा घ्यावा. या करिता इंदापूर तालुक्यातील ३० शाखांची कर्मचारी यंत्रणा तयार असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे विभागीय अधिकारी आनंद थोरात यांनी दिली आहे.
फोटो ओळ : आनंद थोरात विभागीय अधिकारी