‘अटल भूजल’ कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:10+5:302021-07-25T04:09:10+5:30

पुणे : पुणे जिल्ह्यात ११८ गावांत सुरू असणाऱ्या ‘अटल भूजल योजने’तील कामांना गती देताना कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर ...

Pay special attention to the quality of ‘Atal Groundwater’ work | ‘अटल भूजल’ कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्या

‘अटल भूजल’ कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्या

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात ११८ गावांत सुरू असणाऱ्या ‘अटल भूजल योजने’तील कामांना गती देताना कामांचा दर्जा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्र पुरस्कृत ‘अटल भूजल योजने’त जिल्ह्यातील निवड झालेल्या ११८ गावांतील कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, भूजल सर्वेक्षणचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, या योजनेतील कामांसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील निवड झालेल्या ११८ गावांमध्ये अशा पद्धतीने चांगली कामे करा की, ज्याचे अनुकरण अन्य गावे करतील. या कामांसाठी ‘एनजीओ’ नेमताना कामाचा दर्जा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्या, समितीची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Pay special attention to the quality of ‘Atal Groundwater’ work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.