खराडीतील पेईंग गेस्ट चालकाने घडविले माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:52+5:302021-04-15T04:10:52+5:30
वेंकट कटारी असे पेईंग गेस्ट निवास व्यवस्था चालकाचे नाव आहे. खराडीत आयटी क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर पेईंग गेस्ट ...
वेंकट कटारी असे पेईंग गेस्ट निवास व्यवस्था चालकाचे नाव आहे. खराडीत आयटी क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर पेईंग गेस्ट निवास व्यवस्था चालवली जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पेईंग गेस्ट निवास बंद पडून आहेत. रुग्णालयात नियमानुसारच बेडची संख्या ठेवावी लागते. त्यामुळे जागा असूनही बेड ठेवता येत नाही. मात्र कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे जीव सोडवा लागत आहे.
एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासत होती. मात्र कुठेही बेड मिळत नव्हता. शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण खैरे, प्रभाग अध्यक्ष निखिल गायकवाड, सायबु कद्रकापूरकर व योगेश शितोळ यांनी खासगी रुग्णालयाला विनंती करून उपचार सुरू करण्यास सांगितले. मात्र बेड नसल्याने रुग्णाला जमिनीवर झोपावे लागले. बेड ठेवायला जागा होती. त्यानुसार रुग्णालयाला विनंती करून बेड ठेवण्याची तयारी करण्यात आली. पेईंग गेस्ट निवास व्यवस्था चालक कटारी यांनी कोणताही विचार न करता बेड उपलब्ध करून दिला. तसेच शिल्लक असलेले बेड देखील देण्याची तयारी असून कोणालाही उपचार कमी पडू देऊ नका, अशी विनंती त्यांनी रुग्णालयाला केली. वेळीच उपचार सुरू झाल्याने रुग्णांची प्रकृती सुधारण्यास मदत झाली. नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.