बिल भरून वीजपुरवठा सुरळीत, दूरध्वनीसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:44 AM2019-03-16T01:44:10+5:302019-03-16T01:44:26+5:30
बँकांचे व्यवहार पूर्ववत; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल, आदिवासी बांधवांना दिलासा
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मागील महिन्यापासून बीएसएनएल कंपनीच्या मनोऱ्याचे वीजबिल थकबाकी असल्यामुळे मनोऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. भारत दूरसंचार लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीची दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे या भागात असणाºया बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार य्वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने बीएसएनएल कंपनीने तत्काळ या मनोऱ्यांचे वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. यामुळे बँकाचे व्यवहार नियमित झाले आहेत. याबाबत आदिवासी बांधवांनी ‘लोकमत’चे मनोमन आभार मानले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा डोंगरदºया खोºयांमध्ये विस्तारलेला आहे. काही वर्षांपूर्वी या आदिवासी भागात आदिवासी जनतेचा संपर्क इतरत्र व्हावा, यासाठी तळेघर, राजेवाडी, डिंभे या गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचे मनोरे उभारण्यात आले. यामुळे या भागातील आदिवासी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
जगाच्या कानाकोपºयात असलेल्या आपल्या मुलामुलींशी व नातेवाइकांशी संपर्क होऊ लागला. यामुळे या परिसरात बीएसएनएल कंपनीचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढू लागले. त्याचप्रमाणे भीमाशंकर, पाटण, आहुपे या खोºयांतील आदिवासी जनतेचा आर्थिक प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी तळेघर, अडिवरे, डिंभे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सुरू करण्यात आल्या.
यानंतर या बँका आॅनलाइन जोडण्यात आल्या; परंतु एक महिन्यापासून बीएसएनएल कंपनीच्या मनोºयाचे वीजबिल थकबाकी असल्यामुळे मनोºयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
भारत दूरसंचार लिमिटेड कंपनीची दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे या भागातील बँकांचे व्यवहार ठप्प झाले. यामुळे आदिवासी जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना बँकेतील हक्काचे पैसे काढता येत नव्हते. याची दखल घेऊन ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त वारंवार प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने बीएसएनएल कंपनीने तत्काळ या मनोºयांचे वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून दूरध्वनी सेवा सुरू केली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा आॅनलाइन झाल्यामुळे नेटवर्क असल्याशिवाय बँकेचे व्यवहार करता येत नाहीत. एका महिन्यापासून दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. रेंज नसल्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हताने परतावे लागत असत, दूरध्वनी सेवा सुरू झाल्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.
- संकल्प शिंदे,
शाखाधिकार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा तळेघर
वीजबिल थकीत असल्यामुळे एका महिन्यापासून तळेघर येथील बीएसएनएल कंपनींच्या मनोºयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीजबिल भरल्यानंतर तत्काळ हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
-दिनेश झोनवाल, कनिष्ठ अभियंता, घोडेगाव