ओटीपी शेअर केला नसताना पेटीएम पोस्टपेड अकाउंट झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:35+5:302021-09-26T04:10:35+5:30

पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाउंटमधून दिल्ली व ...

Paytm postpaid account was down when OTP was not shared | ओटीपी शेअर केला नसताना पेटीएम पोस्टपेड अकाउंट झाले खाली

ओटीपी शेअर केला नसताना पेटीएम पोस्टपेड अकाउंट झाले खाली

googlenewsNext

पुणे : कोणत्याही प्रकारे ओटीपी शेअर केला नसतानाही तसेच ओटीपी मिळाला नसताना पुण्यातील तरुणाच्या पेटीएम पोस्टपेड अकाउंटमधून दिल्ली व इतर ठिकाणाहून १३ व्यवहारांद्वारे परस्पर रिचार्ज करून अकाउंट खाली करण्यात आले.

याप्रकरणी अल्केश परदेशी (वय ३३, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. परदेशी यांचा व्यवसाय असून त्यांनी घटनेच्या तीन दिवसांपूर्वी एजंटच्या आग्रहामुळे पेटीएम पोस्टपेड हे क्रेडिट अकाउंट सुरू केले होते. १ फेब्रुवारीला रात्री ते इंटरनेट बंद करून झोपी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना मेल मिळाले होते. त्यात १३ पेटीएम ट्रान्झेक्शनद्वारे मोबाइल रिचार्ज झालेले दिसले. त्यांचे पेटीएम व्हॅलेट आणि बँकेतील रक्कम, एफडी सुरक्षित असल्याचे दिसले. त्यांनी ३ दिवसांपूर्वी सुरू केलेल्या पेटीएम पोस्टपेडमध्ये त्यांना ९ हजार २५० रुपये क्रेडिट बॅलन्स मिळाला होता. त्याद्वारे परस्पर ८ हजार ९७५ रुपयांचे १३ व्यवहाराद्वारे मोबाइल रिचार्ज करण्यात आले होते. त्यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता की त्यांना कोणताही ओटीपी आला नव्हता. तरी त्यांच्या पेटीएम पोस्टपेडमधून व्यवहार झाले. हे सर्व व्यवहार रात्री २.२० ते ३.४३ या दरम्यान पैसे काढण्यात आले होते. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे मोबाईल नंबर दिल्ली व उत्तर प्रदेशातील असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासाने पुढील तपासासाठी हा गुन्हा सिंहगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पेटीएम पोस्टपेड खाते सुरू केल्यानंतर त्यातून कोणताही व्यवहार केलेला नसताना या तरुणाच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली गेली आहे. त्याचा रीतसर गुन्हा दाखल झाला असताना आता, कंपनीने त्यांना हे पैसे भरा असा तगादा लावला आहे.

Web Title: Paytm postpaid account was down when OTP was not shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.