पॉझ मशीनची केली पाहणी
By admin | Published: March 22, 2017 03:22 AM2017-03-22T03:22:43+5:302017-03-22T03:22:43+5:30
स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या पहिला पीओएस (पॉझ) मशीनची विभागायी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पाहणी केली.
पुणे : स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या पहिला पीओएस (पॉझ) मशीनची विभागायी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी पाहणी केली. नाना पेठ भागातील सत्यज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात ही मशीन बसविणयात आली आहे. या मशीनमुळे ग्राहकांना फक्त अंगठा दाबून धान्य मिळणार आहे. सदर मशीनशी आधार कार्ड संलग्न असल्यामुळे याद्वारे व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येईल. तसेच, यामुळे रास्त भाव दुकानदारांनाही अधिक फायदा होणार आहे. चोक्कलिंगम यांनी दुकानदारांकडून पीओएस मशीनबद्दल माहिती घेतली, तसेच ग्राहकांना धान्य वितरण करून संवाद साधला. या वेळी पुरवठा उपआयुक्त नीलिमा धायगुडे, अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार तसेच परिसरातील नागरिक व रहिवाशी उपस्थित होते.