PCMC Election | आरक्षण सोडतीवर २७३ हरकती; 'या' प्रभागांवर सर्वाधिक आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:32 PM2022-06-07T13:32:36+5:302022-06-07T13:34:29+5:30
सहा प्रभागातील आरक्षण सोडत, प्रभागाची व्याप्तीबाबत आक्षेप...
पिंपरी : महापालिका निवडणूकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. सहा प्रभागातील आरक्षण सोडत, प्रभागाची व्याप्तीबाबत आक्षेप नोंदविले आहेत. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांच्या सोडतीनंतर २७३ हरकती निवडणूक विभागाकडे आल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक चिखली आणि च-होली मधील आरक्षणावर २६९ हरकती आल्या आहेत. एकाच व्यक्तीने गठ्ठ्याने त्या हरकती दिल्या आहेत.
एकूण पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मागील महिन्यात ओबीसी आरक्षणाविना महिलांसाठीची आरक्षण सोडत काढली. पिंपरी महापालिकेत १३९ जागा असून यामध्ये ७० महिला आणि ६९ पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) २२ जागा राखीव आहेत. त्यात महिलांसाठी १९, ४१, २०, १८, ३७, ४३, ३४, २४, ३५, ११, १४ अशा ११ महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर, २, १६, १७, १८, २२, २५, २९, ३२, ३७, ३८, ३९, ४४, ४६ या ११ जागा एससी पुरुष, महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी ४४,४१ राखीव झाली आहे. तर, प्रभाग ६ मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.
असे झाले आरक्षण
सर्वसाधारण महिलांसाठी ५७ जागा आहेत. त्यातील ४५ जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४६ मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे १२ प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी ४०, १२, ३६, ७,२१, १३,१,४२, ८,३१, २७, ३० हे प्रभाग राखीव झाले. तर उर्वरित प्रभाग हे पुरूषांसाठी राखीव झाले आहेत.
अनुसुचित जातीबाबत आक्षेप
प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत ६ जूनपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या मुदतीत आरक्षण सोडतीवर हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक २ चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडीतील एससीच्या आरक्षणावर आणि प्रभाग क्रमांक ५ चºहोली-चोविसावाडी-वडमुखवाडीतील एसटी आरक्षणा बदलावर सर्वाधिक हरकती आहेत. या दोन प्रभागाबाबत २६९ हरकती एकाच व्यक्तीने दिल्या आहेत. हरकती एकसारख्याच आहेत.
हरकतींचा केवळ सोपस्कार
प्रभाग क्रमांक ३४, ३५, ४३, ११ याबाबत देखील हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी देखील घेतली जाणार नाही. त्यामुळे हरकतींचा काही उपयोग होण्याची शक्यता नाही. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.