PCMC Election| थेरगाव प्रभाग सर्वांत छोटा आणि रावेत सर्वांत मोठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:38 PM2022-07-23T15:38:15+5:302022-07-23T15:40:01+5:30
हरकतींनुसार स्थळ पाहणी करून यादीत बदल...
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महापालिका निवडणूक शाखेने शुक्रवारी अपलोड केली. आक्षेपापूर्वी प्रभाग क्रमांक ३८ वाकड, भूमकर, कस्पटेवस्तीमध्ये सर्वाधिक मतदार, तर सर्वांत कमी ३७ ताथवडे, पुनावळेमध्ये २१ हजार १०२ मतदार आहेत. मतदार यादी अंतिम केल्यानंतर त्यात ८४ हजार मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले. त्यानुसार थेरगाव प्रभाग सर्वांत छोटा आणि रावेत सर्वांत मोठा प्रभाग झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर या मतदार यादीत अंतिम करण्यासाठी सूचना आणि हरकतींना वेळ देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारपर्यंत यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्याची मुदत होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील गोंधळामुळे चोवीस तास अपलोड करण्यास अडचण आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत अपलोडिंग सुरू होते. हरकतींनुसार स्थळ पाहणी करून यादीत बदल केला आहे.
३१ मे २२ अखेरपर्यंत विधानसभा मतदारयादीमध्ये नोंदी झालेल्या मतदारांची नावे घेतली आहेत. त्यानुसार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८६ हजार ८४९ मतदार आहेत, तर भोसरी विधानसभा मतदारसंघात ५ लाख २७ हजार ७९९, पिंपरी विधानसभेत ३ लाख ७६ हजार ४७० आणि भोर विधानसभा मतदारसंघातील ताथवडेगावात ९ हजार ५७५ मतदार आहेत. एकूण १५ लाख ६९३ मतदार आहेत. त्यापैकी १२ हजार ५६४ वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला १४ लाख ८८ हजार १२९ मतदारांना हक्क बजाविता येणार आहे. त्यात पुरुष ८ लाख ३९४, महिला ६ लाख ८७ हजार ६४७ आणि इतर ८८ मतदार आहेत. दरम्यान, २०१७ च्या निवडणुकीपेक्षा तीन लाख मतदार वाढले आहेत.
प्रभाग नाव, एकूण मतदार, वाढ, घट
१) तळवडे रूपीनगर : ३५ ०२२, ०, ७
२) चिखली गावठाण : ३३०२४, ६०५, ०
३) बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी : ४६९५१, ०,२५५
४) मोशीगावठाण, डुडुळगाव : २३७८२, ८२५, ०
५) चऱ्होली, चोविसावाडी : ३५३६२, ०,३४३
६) दिघी, बोपखेल : ३६०३४, ३०८,
७) सँडविक कॉलनी, रामनगर : २५४८२, १३८९,०
८) भोसरी गावठाण, गवळीनगर : ३४३८५, ०,२०८६