आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:57 PM2017-11-29T17:57:14+5:302017-11-29T18:01:43+5:30

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या सभागृहात पार पडला. आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले.

Peace important on the border for economic progress: David R. Simelaeh; Convocation of NDA | आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ

आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता महत्त्वाची : डेव्हीड आर. सिमेलेह; एनडीएचा दीक्षांत समारंभ

Next
ठळक मुद्देभविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल, येणारा काळ हा आव्हानांचा : डेव्हीड आर. सिमेलेहएनडीएत मिळणारे प्रशिक्षण अतिउच्च दर्जाचे : जसजित सिंग कलेर

पुणे : कुठल्याही देशाला आर्थिक विकास साधायचा असेल, तर त्या देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणूण ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवी आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिमेलेह बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे कमांडन्ट एयर मार्शल जसजीत सिंग कलेर, प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्वर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरूवंशसिंग गोसाल ठरला. बीएससी कॉप्यूटर सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी तर कला शाखेतील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट ठरला. तिघांनाही प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते या ट्रॉफी देण्यात आल्या.
सिमेलेह म्हणाले, जागतीक पातळीवर अनेक बदल आज होत आहे. आर्थिक विकासासाठी अनेक देश प्रयत्नशिल आहेत. मात्र, सीमेवर शांतता असल्यास आर्थिक विकास वेगाने साधता येतो. ही शांतता राखण्यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय लष्कराला प्रतिष्ठा आहे. एक शिस्तबद्ध संघटन म्हणून लष्कर परिचित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठी चाळणी पार करून विद्यार्थी येथे दाखल झाले आहे. समानतेचे प्रतिक असलेल्या भारतीय लष्करात देशसेवेसाठी या विद्यार्थ्यांनी येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल होणार आहे. या मुळे येणारा काळ हा आव्हानांचा असेल. यासाठी नवे बदल स्विकारण्याची तयारी ठेवा, नवी कौशल्य आत्मसात करून स्वत: ला सिद्ध करा. 
जसजित सिंग कलेर म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संपूर्ण जगातील लष्करी सेवेसाठी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. आतापर्यंत देशाच्या तिन्ही दलाला जवळपास ३६ हजार अधिकारी दिले आहेत. तर जवळपास ३० लष्करप्रमुख दिले आहेत. यातील अनेक जन आज लष्कराचे नेतृत्व करत आहेत. या ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण अतिउच्च दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी तीन वषार्चे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून दिला. तर प्रबोधनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

२५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३ व्या तुकडीतील २५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यात बॅचलर आॅफ सायन्सचे ५६,बॅचलर आॅफ  कॉम्प्युटर सायन्सचे १४६ आणि बॅचलर आॅफ आर्ट्सच्या ४८ च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी पायदळ, वायुदल तसेच नौदलात सेवा बजावण्यासाठी सिद्ध झाले आहेत.

आज रंगणार संचलन सोहळा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३ तुकडीचा संचलण सोहळा पार पडणार आहे. यानंतर हे विद्यार्थी पुढील लष्करी शिक्षणासाठी एनडीएतून बाहेर पडणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून किरगीझ रिपब्लिकचे लष्करप्रमुख रेमबेरडी दुशेनबीएव्ह उपस्थित राहणार आहेत. सूर्यकिरण या विमानांचे प्रात्यक्षिक हे या सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत.

तीन वर्षांचा काळ आव्हानात्मक 
लहाणपनापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे. एनडीएतीन तीन वर्ष खूप आव्हानात्मक होते. सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान सोबत असलेल्या मित्रांमुळे ही आव्हानांना सामोरे जाऊ शकलो असे, बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्वर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरूवंशसिंग गोसाल याने सांगितले. गुरूवंश हा पंजाबमधील उपनगर येथील आहे. त्याचे वडील कृषीविभागात अधिकारी आहेत. लष्कराची घरात कुठलीही पार्श्वभूमी नसतांना त्याने हे यश मिळवले आहे. लष्करात आघाडीवर काम करायचे आहे. जम्मू काश्मिर तसेच देशांच्या विविध सीमांवर जवानांची आज गरज आहे. यासाठी पायदळात दाखल होण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोसाल याने सांगितले.

व्यक्तीमत्वात मोठा बदल
एनडीएत तीन वर्षात मिळलेले प्रशिक्षणा दरम्यान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त, अनुशासन आणि वक्तशिरपणा यामुळे व्यक्तीमत्वात मोठा बदल झाल्याचे कला शाखेतील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट याने सांगितले. देशात दहशतवादाचा प्रश्न गंभीर आहे. तसेच सीमवेवर शत्रुराष्ट्राकडून कुरापती केल्या जातात. या आव्हाहनाला तोंड देण्यासाठी लष्करात जाण्याचा निर्णय राहूलने घेतला आहे. राहूल बिष्ट हा मुळचा देहरादूनचा आहे. त्याचे वडील निवृत्त हॉनररी कॅप्टन असून लष्करात दाखल होण्याचे बाळकडू त्याला त्याच्या वडीलांकडून मिळाले आहे. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनित शिकण्याचे स्वप्न पूर्ण
भारतीय लष्कराचे लहाणपणापासून आकर्षण होते. बाबा नौदलात अधिकारी असल्याने त्यांना पाहून लष्करात जाण्याची इच्छा प्रबळ झाली होती. लष्करीशिक्षण हे एनडीएतून घेण्याचे माझे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे, असे बी. एससी. कॉम्प्यूटर सायन्स विभागातील कमांडन्ट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी याने सांगितले. अनमोल हा मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. तीन वर्षाच्या काळात सांघिक जीवन आणि शिस्त या गोष्टी अंगिभूत झाल्या. भविष्यात नौदलात नेव्हीगेशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. 

Web Title: Peace important on the border for economic progress: David R. Simelaeh; Convocation of NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.