जैन समाजाकडून शांतीचा संदेश, जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:23 AM2017-11-21T01:23:06+5:302017-11-21T01:23:28+5:30
बिबवेवाडी : जैन समाजाने जगाला दिलेल्या शांतीच्या संदेशाची आज जगाला खºया अर्थाने आवश्यकता आहे.
बिबवेवाडी : जैन समाजाने जगाला दिलेल्या शांतीच्या संदेशाची आज जगाला खºया अर्थाने आवश्यकता आहे. भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर जर जग चालले तर सर्वांचा विकास शक्य आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. ते जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानी बोलत होते.
जैन संदेश फाउंडेशनच्या वतीने राज्यातील ३० व्यक्तींना त्यांच्या कार्यावर आधारित जैन दीपस्तंभ, समाजभूषण व समाजरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रमेश भाटकर, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, अॅड. अभय छाजेड, नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, अशोक पगारिया, ओमप्रकाश रांका, प्रफुल्ल कोठारी, मोहनलाल लोढा यांची उपस्थिती होती. जैन दीपस्तंभ धनराज श्रीश्रीमाळ, विमल सुदर्शन बाफना, पुष्पा कटारिया, संजय चोरडिया, भंवरलाल जैन, हिरालाल साबद्रा यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुभाषबाबू लुंकड, नितीन चोपडा, सुभाष ललवाणी, महेंद्र सुंदेचा मुथ्था, सुरेश मुथ्था यांनी प्रयत्न केले.
समाजभूषण पुरस्काराचे मानकरी
मदनलाल बलदोटा, संतोष भंडारी, विमल संचेती, सुमतिलाल गांधी, शांतिलाल बोरा, सुवालाल बोरा, शांतिलाल दुगड, चंदनमल बाफना, बाबूलाल भंडारी, कांतिलाल चोरडिया, कन्हैयालाल रुणवाल, राजेंद्र कटारिया यांना देण्यात आला. समाजरत्न पुरस्कार सुनील बाफना, विजय बंब, अनिल भंडारी, श्रीकांत चंगेडिया, दिलीप चोरडिया, मांगीलाल मांडोत, नंदकुमार भटेवरा, सागर सांकला, धरमचंद लोढा, माया कटारिया, सूरजबाई बंब, विजया बोथरा यांना देण्यात आला.