महामार्गालगतच्या गावातून शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:41+5:302021-01-16T04:15:41+5:30
भोर तालुक्यातील नसरापूर येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.दुपारी १ ...
भोर तालुक्यातील नसरापूर येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.दुपारी १ ते ३ पर्यंत मतदान संथ झाले दुपारी ३ नंतर मतदान वेगाने झाले.
पुणे सातारा महामार्गालगतच्या गावातून झालेल्या मतदानाची एकूण संख्या व टक्केवारी पुढिल प्रमाणे नसरापूर १२३५(७८.६६), केळवडे १७६८(७९.६७), कामथडी १५८०(८०.८१), देगाव: ७८५(८२.३८), हातवे बु.:१५०२(९०.४८) , हातवे खु ६६६(८९.७५), जांभळी :(८८), तांभाड : २९९ (८३.७५) असे मतदान झाले.
यावेळी नसरापूर आदी ठिकाणी राजगड पोलीस ठाण्याचे पो. नि.विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस, सीआरपीफचे जवान आणि होमगार्ड मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता तर महसूल विभागाने मतदान प्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य केले.