पावलोपावली अतिक्रमणांचे ‘पीक’

By admin | Published: July 24, 2015 04:18 AM2015-07-24T04:18:11+5:302015-07-24T04:18:11+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्र शासनाने देशभरात लागू केलेले शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत पुणे महापालिका

'Peak' of encroachments on Pavlapavawala | पावलोपावली अतिक्रमणांचे ‘पीक’

पावलोपावली अतिक्रमणांचे ‘पीक’

Next

सुनील राऊत, पुणे
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केंद्र शासनाने देशभरात लागू केलेले शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत पुणे महापालिका आघाडीवर असली तरी, शहरातील रस्त्यांवर दर महिन्याला १ हजारांहून अधिक अतिक्रमणांवर कारवाई होते. गेल्या सात महिन्यांत महापालिका प्रशासनाने शहरात केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली असून, महापालिकेडे असलेली यंत्रणा पाहता शहरात आणखीन तेवढीच अतिक्रमणे कारवाई विना असलेली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने डिसेंबर २०१४ ते ३० जून २०१५ पर्यंत शहरात केलेल्या कारवाईत पदपथ तसेच रस्त्याच्या कडेला असलेली तब्बल ७ हजार ८४ अतिक्रमणे कारवाई करून काढली आहेत. त्यात स्टॉल, हातगाडी, पथारी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांचा समावेश आहे.
महापालिकेकडून गेल्या दीड वर्षापासून शहरात शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यावर असलेल्या प्रत्येक पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांना ओळखपत्र तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा प्रकारे महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २००९ मध्ये महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १५ हजार पथारी व्यावसायिक होते. त्यानंतर २०१३ मध्ये महापालिकेने फेरीवाला धोरणा अंतर्गत शहरात सर्वेक्षण केल्यानंतर ही संख्या तब्बल २६ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या सर्वेक्षणात ज्या पथारी व्यावसायिकांची नोंदणी झाली आहे. त्यांना परवाना प्रमाणपत्राचे देण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ज्या भागात परवाना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्या ठिकाणी तसेच शहरातील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर गेल्या सहा महिन्यांपासून कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत गेल्या सात महिन्यांत तब्बल ७ हजार ८४ अतिक्रमणे काढण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता महिन्याला जवळपास १ हजार अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचे दिसून येते.
महापालिकेकडून प्राधान्याने रस्त्यावरील अतिक्रमणे काढली असली तरी, शहरात आणखी तेवढीच अतिक्रमणे असण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे कारवाईसाठी तसेच या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाकडून गेल्या सहा महिन्यांपासून ही अतिक्रमण कारवाई शहरात सुरू आहे. मात्र, त्यातील काही ठिकाणी कारवाईनंतर नागरिकांनी विरोध केल्याने ही कारवाई थांबविण्यात आली आहे.
शहरात महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईचा गवगवा केला जात असला तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चौकात नवनवीन खाद्यपदार्थ विक्रेत्यांंच्या चौपाट्या वाढत असल्याचे दिसून येते. या चौपाट्यांंनी पदपथ गिळंकृत केले असून, चौकांच्या कोपऱ्यातील मोक्याच्या जागा बळकविल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याने त्यावर कारवाईस प्रशासन धजावत नसल्याचे चित्र आहे. टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्त्यावर या चौपाट्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

Web Title: 'Peak' of encroachments on Pavlapavawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.