शेतकऱ्यांना ‘के्रडिट कार्ड’द्वारे काढता येणार पीककर्ज
By admin | Published: April 13, 2015 11:02 PM2015-04-13T23:02:04+5:302015-04-13T23:02:04+5:30
विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून सहजरित्या ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’च्या माध्यमातून पीककर्ज काढता येणार आहे.
पुणे : पीक कर्ज मिळण्यासाठी गावातील विकास सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना मारावे लागणारे हेलपाटे व कर्ज मिळण्यास होणार विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून सहजरित्या ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’च्या माध्यमातून पीककर्ज काढता येणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येत्या महिन्यात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या कार्डचे वापट करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक आर. सी. भोसले उपस्थित होते. शेतीसाठी पीककर्ज विनाविलंब उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार व नाबार्ड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कर्ज वितरणाची व्यवस्था सुलभ, पारदर्शक करण्यासाठी ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
(वार्ताहर)
४यामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेले कर्ज या के्रडिट कार्डद्वारे वापरता येणार आहे. यासाठी जिल्हा बँकेने एचडीएफसी या बँकेशी करार केला असून, देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कार्डधारक शेतकऱ्यांना पैसे काढता येतील.
४चालू अर्थिक वर्षांत पुणे जिल्हा बँकेला तब्बल १४४.७० कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, देशात जिल्हा बँकांमध्ये सर्वांधिक ढोबळ नफा मिळविणारी पुणे जिल्हा बँक ठरली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यामध्ये सुमारे ९ कोटींची वाढ झाली आहे.
४ठेवींमध्येदेखील एक हजारांची वाढ झाली असून, सध्या बँकेत ७,०३५.५० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सध्या बँकेची शहर आणि जिल्ह्यात २६ एटीएम सेंटर सुरु असून, येत्या काही दिवसांत आणखी २५ सुरु होणार आहेत.
४याशिवाय, एनी ब्रँच बँकिंग, एसएमएस अलर्ट सुविधा सुरु आहे. बँक आपल्या खातेदारांसाठी लवकरच मोबाईल व नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे दुर्गाडेक्ष यांनी सांगितले.