Pune: पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहन पसार, चाकणमधील 'हिट अँड रन'ची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 17:38 IST2024-06-12T17:38:26+5:302024-06-12T17:38:51+5:30
पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अनोळखी पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. चाकण येथे पुणे -नाशिक महामार्गावर सोमवारी (दि. ...

Pune: पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहन पसार, चाकणमधील 'हिट अँड रन'ची घटना
पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अनोळखी पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी (दि. १०) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
रुग्णवाहिका चालक ओमकार बाजीराव कुलाळ (१९, रा. राक्षेवाडी, चाकण) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. ११) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अनोळखी व्यक्ती रस्त्याने पायी चालले होते. ते चाकणमधील तळेगाव चौक येथील कोहिनूर सेंटरजवळील चौधरी ढाब्यासमोर आले असता भरधाव, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात अनोळखी पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनेची माहिती न देता तसेच घटनास्थळी न थांबता पळून गेला.